Tuesday, February 17, 2026 08:16:18 AM

Navi Mumbai: निवडणुकीत पैसे वाटप? नवी मुंबईत मनसेने शिवसेनेला धरलं धारेवर; Video Viral

नवी मुंबईत प्रचारादरम्यान पैसे वाटप होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

navi mumbai निवडणुकीत पैसे वाटप नवी मुंबईत मनसेने शिवसेनेला धरलं धारेवर video viral



निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत. नवी मुंबईतून एक खळबळजनक प्रकार समोर आला असून, शिवसेनेकडून कथितरित्या पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप मनसेने केला आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

मनसेने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा व्हिडिओ सादर केला. प्रचाराच्या काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी आर्थिक व्यवहार केले जात असल्याचे या व्हिडिओत दिसत असल्याचा दावा मनसेकडून करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तींना रंगेहाथ पकडल्याचा आरोप करत मनसेने निवडणूक आयोगाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

निवडणूकच्या काळात असा प्रकार गंभीर मानला जात असल्याने, प्रशासन आणि निवडणूक आयोग यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


सम्बन्धित सामग्री