केंद्रीय सुरक्षा समितीकडून हल्ल्याचा तीव्र निषेध; भारताचे पाच निर्णय पाकिस्तानसाठी घातक ठरणार

जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे भारताने पाकिस्तावर कडक निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे.

केंद्रीय सुरक्षा समितीकडून हल्ल्याचा तीव्र निषेध; भारताचे पाच निर्णय पाकिस्तानसाठी घातक ठरणार

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे भारताने पाकिस्तावर कडक निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तान विरोधात पाच मोठे निर्णय घेत पाकिस्तानवर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. भारत सरकारच्या निर्णयांमुळे पाकिस्तानची कोंडी होणार आहे. 

पाकड्यांची कोंडी 
पाकिस्तानी राजदुताची भारतातून हकालपट्टी, भारतानं पाकिस्तानचं पाणी तोडलं, सिंधू जल वाटप करार स्थगित, पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेश बंदी, अटारी प्रवेश चौकी 1 मेपासून बंद राहणार, भारतातील पाकिस्तानी उच्चायोग बंद , पुढील 48 तासांत पाक नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे पाकिस्तावर काय परिणाम होणार जाणून घेऊयात… 

पाकिस्तानी राजदुताची भारतातून हकालपट्टी

भारताने पाकिस्तानी दुतावासांना भारत सोडण्यासाठी एका आठवड्याची मुदत दिली आहे. दोन्ही उच्चायुक्तालयांमधून सेवा सल्लागारांच्या पाच सहाय्यक कर्मचाऱ्यांनाही परत बोलावले जाईल.नवी दिल्ली इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातील अशा सल्लागारांनाही परत बोलावले. यामुळे पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर आपमान सहन करावा लागेल. दहशतवादी असल्याचा कलंक अधिकच गडद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक देश पाकिस्तानपासून हात राखून राहतील.  

हेही वाचा : पहलगाम दहशतवाद हल्ल्याप्रकरणी पुण्यातील अलका चौकात भाजपकडून निषेध आंदोलन

सिंधू जल वाटप करार स्थगित
1960 मध्ये भारत आणि पाकिस्तानने सिंधू नदीच्या पाण्याच्या वाटपासाठी  सिंधू पाणी करारावर स्वाक्षरी केली. या कराराला स्थगिती दिल्याने सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांचा अमर्याद वापर   करु शकतो. यामुळे पाकिस्तानात पाणीबाणी येऊ शकते. 

अटारी बॉर्डर 1 मेपासून बंद राहणार
भारताने 1 मे पासून अटारी बॉर्डर बंद करण्याची घोषणा केली आहे. ज्यांनी कायदेशीर पद्धतीने बॉर्डर पार केली आहे. ते 1 मे पूर्वी त्या मार्गाने परत जाऊ शकतात. अटारी बॉर्डर ही भारत आणि पाकिस्तानमधील रस्ते व्यापाराचे केंद्र आहे. चेकपोस्ट बंद झाल्याने पाकिस्तानात भारतातून आयात होणाऱ्या टोमॅटो, साखर, चहा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंवर परिणाम होईल. ज्यामुळे पाकिस्तानात महागाई वाढेल. 

भारतातील पाकिस्तानी उच्चायोग बंद 
भारतातील पाकिस्तानी उच्चायोगातील कर्मचाऱ्यांची एकूण संख्या सध्या 55वरुन 30 पर्यंत कमी केली जाईल. यामुळे पाकिस्तानवर राजकीय दबाव वाढेल. पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या माध्यमातून दहशतवाद्यांना मदत करत आहे. याशिवाय, तो वेगवेगळ्या मार्गांनी भारतविरोधी लोकांना निधी देत ​​आहे. आता या कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे, त्याचे गैरकृत्य कमी होईल. शिवाय त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरही अपमान सहन करावा लागेल. 

पाक नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश 
सार्क व्हिसा एक्झेम्प्शन स्कीमद्वारे (SVES) पाकिस्तानी नागरिकांना यापुढे भारतात प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. पाकिस्तानी नागरिकांना पूर्वी जारी केलेला एसव्हीईएस व्हिसा रद्द मानला जाईल. एसव्हीईएस व्हिसाद्वारे भारतात आलेल्या नागरिकांना 48 तासात भारत सोडण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे आता भारतात येण्यासाठी इच्छुक असणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना भारतात येण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number