Chhatrapati Sambhajinagar : व्हिट्स हॉटेल लिलाव प्रकरणाची विभागीय आयुक्तांकडून चौकशी; शिरसाटांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशन रोडवरील व्हिट्स हॉटेल व लगतच्या मोकळ्या जागेच्या वादग्रस्त लिलाव प्रक्रियेची आता विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी होणार आहे.

Chhatrapati Sambhajinagar : व्हिट्स हॉटेल लिलाव प्रकरणाची विभागीय आयुक्तांकडून चौकशी; शिरसाटांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाचा सहभाग हॉटेल लिलावात सहभाग असलेल्या छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशन रोडवरील व्हिट्स हॉटेल व लगतच्या मोकळ्या जागेच्या वादग्रस्त लिलाव प्रक्रियेची आता विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी होणार आहे. यावेळी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्य कमिटी चौकशी करणार आहे. 

यापूर्वी ही चौकशी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली होती. विट्स हॉटेल आणि परिसरातील मोकळ्या जागेच्या व्यवहारांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. सुमारे 150 कोटी रुपयांची बाजारमूल्य असलेली मालमत्ता अवघ्या 64 कोटी रुपयांत विकली गेल्याचा मुद्दा विधिमंडळातही उपस्थित झाला होता. या लिलावात पालकमंत्र्यांच्या पुत्राची कंपनी सहभागी असल्याने प्रकरण अधिक वादग्रस्त ठरले. चौकशीसाठी आता 8 सदस्यांची उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. व्हिट्स हॉटेल प्रकरणे पालकमंत्र्यांची अडचणी वाढणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number