सांगली: शुक्रवारी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगली दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच सांगलीत येत असल्यामुळे त्यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सांगली पोलीस मुख्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन होणार आहे. यानंतर, पोलिस अधिकाऱ्यांची बैठक देखील होणार आहे. पोलीस मुख्यालयाच्या उद्घाटनानंतर भाजप कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न होणार आहे. यानिमित्ताने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
हेही वाचा: युट्यूबर ज्योती मल्होत्रा 3 वेळा दिली मुंबईला भेट; गर्दीच्या ठिकाणी ज्योतीचा वावर