CJP आंदोलनाचे मुंबईत पडसाद; महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी पोलिसांच्या ताब्यात

CJP आंदोलनासोबतच मुंबईमधून एक मोठी अपडेट समोर आली आहे.
Activist Detained
Tushar Gandhi Detained

CJP आंदोलनासोबतच मुंबईमधून एक मोठी अपडेट समोर आली आहे. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांना वांद्रेतील नॅशनल महाविद्यालयाच्या परिसरातून अटक करण्यात आली आहे. तुषार गांधींचा दिल्लीच्या जंतर-मंतरवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सुरु असलेल्या CJP च्या आंदोलनाला पाठिंबा आहे.

या आंदोलनाच्या समर्थनार्थ तुषार गांधी यांच्यासह अनेक संघटनांनी आज दुपारी 2 ते 5 या वेळेत ऑगस्ट क्रांती मैदानावर आंदोलन करण्यासाठी परवानगी मागितली होती, परंतु ती नाकारण्यात आली. मात्र तुषार गांधी आणि त्यांचे समर्थक ऑगस्ट क्रांती मैदानावर पोहोचण्यापूर्वीच त्यांना नॅशनल कॉलेजमध्ये ताब्यात घेण्यात आले. अटक करण्या बाबाबतचा व्हिडिओ तुषार गांधी यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा – लाठीमारापासून अश्रूधुरापर्यंत… आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना नेमके काय अधिकार असतात?

व्हिडिओनुसार, त्यांना वांद्रे येथून जुहू, सांताक्रूझ आणि नंतर डी.एन. नगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. व्हिडिओमध्ये, त्यांनी दावा केला की, लोक कोणत्याही परिस्थितीत आंदोलनासाठी जमतील आणि कोणतीही शक्ती त्यांना थांबवू शकणार नाही.

पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ऑगस्ट क्रांती मैदानासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. दरम्यान, मुंबईतील शिवाजी पार्कमधील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version