Bachchu Kadu Vs Jaykumar Gore : विधानपरिषदेत सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी! बच्चू कडूंचा जयकुमार गोरेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव; राजकीय वातावरण तापलं

आमदार बच्चू कडू यांचा सत्ताधारी आमदारांना घरचा आहेर देत विधान परिषदेत मित्रपक्षातील नेत्यावर थेट निशाणा साधला आहे. या घडामोडीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून सत्ताधारी पक्षातह

Bachchu Kadu Vs Jaykumar Gore : विधानपरिषदेत सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी! बच्चू कडूंचा जयकुमार गोरेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव; राजकीय वातावरण तापलं

आमदार बच्चू कडू यांचा सत्ताधारी आमदारांना घरचा आहेर देत विधान परिषदेत मित्रपक्षातील नेत्यावर थेट निशाणा साधला आहे. बच्चू कडू यांच्या वतीने विधान परिषदेत थेट ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या घडामोडीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून सत्ताधारी पक्षातही यावरून खळबळ उडाली आहे.

हेही वाचा- Supriya Sule : शरद पवार आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीवर टीका, सुप्रिया सुळेंनी दिलं सविस्तर उत्तर; विलिनीकरणाच्या चर्चांनाही दिला पूर्णविराम

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामविकास मंत्री यांनी वारंवार चुकीची माहिती देऊन सभागृहाची दिशाभूल केली. संगणक परिचालकांना कमिशन म्हणून पगार दिला जात आहे अशी वारंवार चुकीची माहिती दिली प्रत्यक्षात ग्रामपंचायत संबंधितांचा पगार करतात, त्यामुळे त्यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडत असल्याची माहिती बच्चू कडू यांनी सभागृहाला दिली. यासंदर्भात सभापती राम शिंदे यांच्याकडून याबाबत संबंधित खात्याकडे खुलासा मागवला असून तो प्राप्त झाल्यानंतर यवत निर्णय घेऊ अशी माहिती सभागृहाला दिली. 

यावेळी बच्चू कडू म्हणाले की, "'संगणक परिचालक 50 हजार रुपये कमावतात,' अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सभागृहाला दिली. मंत्री जयकुमार गोरे यांनी केलेला दावा खोटा ठरला तर मी मिशी काढून टाकेन" असं बच्चू कडू यांनी सभागृहात म्हटले. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू आणि भाजप नेते तथा मंत्री जयकुमार गोरे यांच्यात यंदाच्या विधिमंडळ अधिवेशनात चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली. या प्रकरणामुळे आगामी अधिवेशनातही राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number