Monday, June 23, 2025 12:29:59 PM

'महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मॅच फिक्सिंग'; राहुल गांधींच्या आरोपांना फडणवीसांचं प्रत्युत्तर

विधानसभा निवडणुकीत भरगोस मतांनी विजय मिळवण्यासाठी भाजपने 'मॅच-फिक्सिंग' केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मॅच फिक्सिंग राहुल गांधींच्या आरोपांना फडणवीसांचं प्रत्युत्तर

नागपूर: नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर काँग्रेस नेते राहुल गांधींनी घणाघात टीका केली आहे. विधानसभा निवडणुकीत भरगोस मतांनी विजय मिळवण्यासाठी भाजपने 'मॅच-फिक्सिंग' केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे. 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या महायुती सरकारने 288 विधानसभा जागांपैकी 235 जागा जिंकले होते. तेव्हा, भाजपने 132 जागा जिंकले होते, जे राज्यातील त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे.


राहुल गांधींची वादग्रस्त 'एक्स' पोस्ट:

7 जून रोजी काँग्रेस नेते राहुल गांधींनी त्यांच्या 'एक्स' पोस्टवर महाराष्ट्र राज्याच्या भाजप पक्षावर घणाघात टीका केली आहे, ज्यामध्ये राहुल गांधी म्हणाले की, 'भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने राज्यातील लोकशाही प्रक्रियेत गडबड करण्यासाठी पाच-सूत्री मॉडेलचा वापर केला आहे'. 

पायरी 1: निवडणूक आयोगाच्या नियुक्तीसाठीच्या पॅनलमध्ये फेरफार करणे
पायरी 2: मतदार यादीत बनावट मतदार जोडणे
पायरी 3: मतदारांची संख्या वाढवणे
पायरी 4: भाजपला जिथे जिंकण्याची गरज आहे, तिथेच बोगस मतदान करणे
पायरी 5: पुरावे लपवणे

 'महाराष्ट्रात भाजप इतका हताश का होता हे समजणे कठीण नाही. पण हेराफेरी ही मॅच फिक्सिंगसारखी आहे - फसवणूक करणारा पक्ष खेळ जिंकू शकतो, परंतु संस्थांचे नुकसान करतो आणि निकालावरील जनतेचा विश्वास नष्ट करतो'. सर्व संबंधित भारतीयांनी पुरावे पाहिले पाहिजेत. स्वतःचा न्यायनिवाडा करा. उत्तरे मागा. कारण महाराष्ट्रातील मॅच फिक्सिंग पुढे बिहारमध्ये येईल आणि नंतर जिथे भाजप हरत असेल तिथे. मॅच फिक्स्ड निवडणुका कोणत्याही लोकशाहीसाठी विष असतात', अशी टीका देखील राहुल गांधींनी त्यांच्या एक्स पोस्टवर केली आहे.


मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रत्युत्तर:

राहुल गांधींना प्रत्युत्तर देत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक्सवर पोस्ट केले. ज्यामध्ये ते म्हणाले की, 'राहुल गांधींनी बिहारमध्ये पराभव स्वीकारला आहे. जोपर्यंत राहुल गांधी स्वतःला खोटी आश्वासने देत आहेत तोपर्यंत त्यांचा पक्ष कधीही जिंकू शकत नाही. अशा निराधार गोष्टी बोलून राहुल गांधींनी महाराष्ट्रातील मतदारांचा अपमान केला आहे, यासाठी मी त्यांचा निषेध करतो'.


सम्बन्धित सामग्री