मंत्री थोरातांच्या नाराजीनंतर आयुक्तांची दिलगिरी

नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्या महसूल विभागावरील लेटरबॉम्ब नंतर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे पोलिस आयुक्तांवर नाराज झाले आहे. त्यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर हा विषय घालणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, आता पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी महसूल मंत्र्यांकडे दिलगिरी व्यक्त केली आहे. पोलीस आयुक्त दीपक पांडे म्हणाले, ‘ते माझे आदर्श असल्याचे सांगून […]

मंत्री थोरातांच्या नाराजीनंतर आयुक्तांची दिलगिरी

नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्या महसूल विभागावरील लेटरबॉम्ब नंतर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे पोलिस आयुक्तांवर नाराज झाले आहे. त्यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर हा विषय घालणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, आता पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी महसूल मंत्र्यांकडे दिलगिरी व्यक्त केली आहे.

पोलीस आयुक्त दीपक पांडे म्हणाले, ‘ते माझे आदर्श असल्याचे सांगून माझा हेतू कुणाचे मन दुखावण्याचा नाही. तरीही महसूल विभागातील लेटरबाँम्ब मुळे कुणाचे मन दुखावले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. मात्र, मी माझ्या पत्रावर ठाम असल्याचेही पांडे यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच दीपक पांडे म्हणाले, मी काहीही चुकीचे केलेले नाही. माझ्या अनुभवानुसार मी हे पत्र पाठविले आहे. माझ्या नियमांमध्ये हा विषय बसतो. लोकहितार्थ हे पत्र पाठविले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

पोलीस आयुक्तांनी काय म्हटलंय पत्रात?

महसूल अधिकाऱ्यांकडे असणारे अधिकार हे आरडीएक्स सारखे आहेत तर, कार्यकारी दंडाधिकाऱ्यांकडे असलेले अधिकार हे डिटोनेटर सारखे आहेत. यातून एक जिवंत बॉम्ब बनतो जो भूमाफिया यांच्या मर्जीप्रमाणे वागतो. हे भूमाफिया महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून सर्वसामान्य नागरिकांचा छळ करतात. त्यामुळे महसूल यंत्रणेकडून कार्यकारी दंडाधिकारी पदाचे अधिकार काढून शहरीकरण झालेल्या ठिकाणचे अधिकार पोलीस आयुक्तालयाला देण्याची मागणी दीपक पांडे यांनी पत्राद्वारे केली आहे. तसेच मालेगाव शहराला आयुक्तालयाचा दर्जा देण्याची मागणीही दीपक पांडे यांनी केली आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number