Congress On Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’विरोधात चव्हाणांचं वक्तव्य, पाकिस्तानला आयतं कोलीत

काँग्रेस नेता पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय लष्करावर नकारात्मक वक्तव्य केलं आहे, त्यामुळे ते भलतेच चर्चेत आले आहेत.

Congress On Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’विरोधात चव्हाणांचं वक्तव्य, पाकिस्तानला आयतं कोलीत

प्रसाद काथे | 

काँग्रेस नेता पृथ्वीराज चव्हाण सध्या भलतेच चर्चेत आहेत पण त्यांची चर्चा जितकी भारतात आहे त्यापेक्षा जास्त पाकिस्तानच्या माध्यमातून आहे. ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान भारतीय स्थलसेना म्हणजेच लष्कराची अजिबात हालचाल झाली नाही म्हणजेच भारताचा पराभव होता असे चव्हाण यांनी सूचकपणे सांगितले. चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तानला आयते कोलीत मिळाले आहे. चव्हाण जे बोलले ते ऐकून आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. कारण, कारगिल विजय ते ऑपरेशन सिंदूर या दरम्यान काँग्रेसकडून पाकिस्तानचीच भाषा बोलली गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. 

1.    भारत जेव्हा जेव्हा निर्णायक लष्करी यश मिळवतो, तेव्हा काँग्रेस पक्ष अस्वस्थ होतो. ही बाब आता अपवाद राहिलेली नसून ती परंपरा झाली आहे.  विरोधी पक्ष म्हणून प्रश्न विचारणे वेगळे; पण भारताच्या विजयालाच पराभव ठरवण्याचा प्रयत्न करणे, हे थेट राष्ट्रीय हिताविरुद्ध जाणारे आहे. मात्र, काँग्रेसचे तेच धोरण बनले आहे.

2.    भारतीय सैन्याने कारगिलमध्ये मिळवलेला विजय असो, सर्जिकल स्ट्राईक असो, एअरस्ट्राईक असे अथवा आताचे ऑपरेशन सिंदूर असो; काँग्रेसने नेहमीच भारतीय सैन्यदलांना कमी लेखण्याचे काम केले आहे.

3.    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी १६ ऑगस्ट २०१६ रोजी पुण्यात काँग्रेसच्या त्याच धोरणाचा पुनरुच्चार करून राष्ट्रहित काँग्रेससाठी महत्त्वाचे नसल्याचे सिद्ध केले आहे. पाकिस्तानला गुडघे टेकण्यास भाग पाडणारे ऑपरेशन सिंदूर हे अपयशी ठरल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

4.    ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी म्हणजे 7 मे 2025 रोजी भारतीय वायूदलाचा पूर्णपणे पराभव झाला होता. पहिल्या ३० मिनिटातच भारतीय हवाईदलाची विमाने पाडली गेली, परिणामी भारतीय हवाईदलच पूर्णपणे ग्राउंडेड होऊन वायूदलाच्या ग्वाल्हेर, भटिंडा, सिरसा अशा सर्व हवाई तळांवरुन एकही विमान उडाले नाही. कारण पाकिस्तानकडून विमान पाडले जाण्याची शक्यता होती, असा दावा चव्हाण यांनी केला आहे.

5.    एवढेच नव्हे तर ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये जमिनीवरून युद्ध झाले नाही, त्यामुळे आता भारतास लष्कराची गरज काय; असाही धक्कादायक सवाल चव्हाण यांनी केला आहे. भारतास सैन्याची गरजच काय, या पं. नेहरू यांचेच विचार पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडल्याचे स्पष्ट आहे.

6.    दुर्दैव म्हणजे, आपल्या विकृत वक्तव्यांविषयी माफी मागण्यासही त्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे सम्राट पृथ्वीराज चौहान यांचे नाव धारण करणारे प्रत्यक्षात पृथ्वीराज यांच्या कर्तृत्वाला साजेसे वागत नाहीत असेच दिसते.

7.    याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि काँग्रेस यांची आघाडी अधिकच चिंताजनक ठरते. एकीकडे हिंदुत्वाची उघडपणे थट्टा केली जाते, तर दुसरीकडे लष्कराच्या शौर्यावर शंका घेतली जाते.

8.    “गोमूत्र हिंदुत्व”सारखी भाषा वापरून सनातन परंपरेचा अवमान केला जातो. श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेसारख्या ऐतिहासिक क्षणालाही “गोध्रा सारखी घटना घडू शकते” असे विधान करून संशयाच्या छायेत ढकलले जाते. शिवसेना (UBT)च्या सुषमा अंधारे यांच्यासारख्या नेत्यांकडून हिंदू संत, देवता आणि वारकरी संप्रदायाचा अपमान केला जातो.

9.    हिंदुत्व आणि पराक्रमी भारतीय सैन्यदले ही हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धोरणाचे मूर्त अविष्कार आहेत. मात्र, त्यांचीच खिल्ली उडविण्याचे काम उबाठा आणि काँग्रेस करत आहेत. त्याचप्रमाणे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचाही अपमान केला जात आहेत.

10.    ‘ऑपरेशन सिंदूर’विषयीची पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका त्यांचे हायकमांड राहुल गांधी यांच्या भूमिकेप्रमाणेच आहे. कारण, राहुल गांधी यांनीदेखील भारतीय सैन्यदलांचे अभिनंदन करण्याऐवजी पहिला प्रश्न हा “भारताने किती राफेल विमाने गमावली” हा विचारला होता. राहुल गांधी यांची ही भूमिका पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी उचलून धरली होती.

11.    अर्थात, भारतीय सैन्यदलांच्या पराक्रमांचे पुरावे मागण्याची काँग्रेसची सवयच आहे. यापूर्वीदेखील काँग्रेसने सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकचे पुरावे मागितले होते. त्याचवेळी चिनी सैनिक भारतीय सैनिकांना मारहाण करत असल्याचाही दावा त्यांनी केला, ज्यावरून सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना कठोर शब्दात झापले होते.

12.    राहुल गांधी यांनी पाकिस्तानविषयक राजनैतिक प्रोटोकॉलवरून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यावर “गुन्हेगारी कृत्ये” केल्याचा आरोप केला, तर पवन खेरा यांनी त्यांना ‘मुखबिर’ संबोधले; पुढे २९ जुलै २०२५ रोजी संसदेत सरकारकडे ‘राजकीय इच्छाशक्ती नाही’ आणि हवाई दलाच्या वैमानिकांचे ‘हात बांधलेले होते’ असे म्हणत संरक्षण व्यवस्थेवरच संशय उपस्थित केला.

13.    काँग्रेसच्या डीएनएमध्ये देशविरोध इतका बळावला आहे की मल्लिकार्जुन खर्गे शत्रुराष्ट्राला “आमचा पाकिस्तान” म्हणत सीमावर्ती संघर्षांना क्षुल्लक ठरवतात, प्रियांका गांधी – वाड्रा दहशतवादी हत्यांचा निषेध करण्याऐवजी भारतीय गुप्तचर यंत्रणेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात, रेवंत रेड्डी व राजा वारिंग राफेलविषयी अपप्रचार करतात. तर उदित राज “ऑपरेशन सिंदूर”च्या नावावर आक्षेप घेतात.

14.    अर्थात, काँग्रेसच्या या भूमिका काही नव्या नाहीत. यूपीए-१ च्या काळातही काँग्रेसला भारताचा विजय स्वीकारता न आल्याचे स्पष्ट दिसले; कारगिलसारखा ऐतिहासिक विजय मिळूनही सोनिया गांधींनी “आनंद साजरा करण्यासारखे काही नाही” असे म्हणत त्याचे महत्त्व कमी लेखले, आणि परिणामी यूपीए सरकारने तब्बल पाच वर्षे कारगिल विजय दिन अधिकृतपणे साजराच केला नाही.

15.    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोध आणि त्यांच्याप्रती काँग्रेसच्या तिरस्काराचे रुपांतर आता भारताच्या लष्करी, धोरणात्मक आणि कूटनीतिक यशांनाच कमी लेखण्यात झाले आहे. याचा थेट फायदा भारताच्या शत्रुराष्ट्रांना होतो, कारण त्यांना त्यांच्या प्रचारासाठी भारतातूनच पाठिंबा मिळतो.

16.    कारगिलपासून ऑपरेशन सिंदूरपर्यंतचा हा प्रवास एक गोष्ट स्पष्ट करतो – भारतास जेव्हा जेव्हा विजय मिळतो; तेव्हा तेव्हा काँग्रेस पक्ष अस्वस्थ होतो. प्रश्न विचारण्याच्या नावाखाली संशय पेरणे आणि विजयालाच पराभव ठरवणे, ही लोकशाही विरोधकाची भूमिका नसून, राष्ट्रहिताशी तडजोड करणारी मानसिकता आहे. काँग्रेस आणि काँग्रेस आघाडी हिंदुत्व आणि लष्करी शौर्य या दोन्ही बाबत कायम नकारात्मक वक्तव्य का करते याचे उत्तर कधी देणार?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number