मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या पासपोर्टबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. मंत्री छगन भुजबळ यांना कोर्टाकडून विदेश प्रवासाची मुदत वाढवली. एप्रिल महिन्यात ईडीच्या मुंबई कार्यालयात आग लागल्याने भुजबळ यांच्या पासपोर्टचे नुकसान झाले होते. भुजबळ यांना विदेश प्रवासासाठी परवानगी देण्यात आली होती. तसेच, त्यांनी ईडीला सादर केलेला पासपोर्टही परत करण्यात आला होता. मात्र, 13 मे रोजी त्यांना मिळालेला पासपोर्ट भिजलेला आणि फाटलेला होता.
हेही वाचा: मिठी नदी घोटाळा प्रकरणी अभिनेता डिनो मोरियाच्या घरी ईडीचे छापेमारी
या घटनेनंतर, मंत्री छगन भुजबळांनी तात्काळ अर्ज दाखल केला होता. मात्र, नवीन पासपोर्ट मिळण्यात विलंब झाल्याने भुजबळांना २२ मे रोजी व्हिसा मिळाला. हा व्हिसा 28 मे पासून वैध आहे. ज्यामुळे भुजबळ 24 मे ते 8 जून या काळात प्रवास नाही करू शकले. तसेच, त्यांनी 28 मे रोजी प्रवास सुरू केले अशी माहिती त्यांनी कोर्टाला दिली. या अनपेक्षित घटनेमुळे मंत्री छगन भुजबळ यांनी प्रवासाची मुदत 12 जुनपर्यंत वाढवण्याची विनंती केली होती. त्यामुळे, विशेष कोर्टाने दिलासा देत मंत्री छगन भुजबळांना विदेश प्रवासाची परवानगी वाढवली आहे.