AJIT PAWAR ON SHARAD PAWAR : अजितदादांनी केलं शरद पवारांचं तोंडभरून कौतुक; म्हणाले, ‘त्यांच्या कामाला…’

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या काकांचं म्हणजेच शरद पवारांचं तोंडभरून कौतुक केले. 'त्यांच्या कामाला तोड नाही', असंही अजितदादा म्हणाले.

AJIT PAWAR ON SHARAD PAWAR : अजितदादांनी केलं शरद पवारांचं तोंडभरून कौतुक; म्हणाले, ‘त्यांच्या कामाला…’

बारामती: राज्याच्या राजकारणात अनेक नवनव्या घडामोडी घडत असतात. अशातच, एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या काकांचं म्हणजेच शरद पवारांचं तोंडभरून कौतुक केले. 'त्यांच्या कामाला तोड नाही', असंही अजितदादा म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांचं कौतुक केल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. 

हेही वाचा: DCM Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची बातमी; लवकरच पूरग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार मदत

काय म्हणाले अजित पवार?

आज बारामती येथे 'बारामती सहकारी बॅंकेची वार्षिक सर्वसाधारण सभा' होती. यानिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती सहकारी बॅंकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित होते. यादरम्यान, अजित पवार म्हणाले की, 'आपण सर्वांनी मला सहकार्य करा. मी पुन्हा पुन्हा सांगतो मी कामाचा माणूस आहे. ज्यादिवशी मी तुमचं प्रतिनिधित्व करायचं बंद करेल, तेव्हा तुम्हाला आठवेल दादा पाहिजे होते'. 

यादरम्यान, अजित पवारांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांचं तोंडभरून कौतुक केले. अजितदादा म्हणाले की, 'कधी कधी मला राहवत नाही, मी असं म्हणतो की, असा आमदार तुम्हाला कधी मिळणार नाही. मागच्या आमदारांवर टीका करायची नाही, कारण त्यांना राज्याचा आणि देशांतील कामाचा व्याप होता. नाहीतर सगळे म्हणतात दादांनी साहेबांशी तुलना केली. जेव्हा मी 1991 ला आमदार झालो होतो ना, तेव्हा माझं मन म्हणत होतं की शरद पवार यांच्यानंतर तू बारामतीचं नेतृत्व करतो, लोकं पावलोपावली तुझं शरद पवारांशी तुलना करणार. त्यांच्या कामाच्या पद्धतीला तोड नाही'.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number