Wednesday, July 09, 2025 09:36:54 PM

फडणवीसांनंतर शिंदेंच्या राज ठाकरेंना सोबत घेण्याच्या हालचाली

उपमुख्यमंत्री शिंदेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आपल्याकडे आणण्यासाठी मोठा डाव मांडला आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंची युती होणार का? हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

फडणवीसांनंतर शिंदेंच्या राज ठाकरेंना सोबत घेण्याच्या हालचाली

मुंबई: सध्या मुंबई आणि ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. एकीकडे ठाकरे बंधूंची युती होणार असल्याची चर्चा असताना, दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आपल्याकडे आणण्यासाठी मोठा डाव मांडला आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंची युती होणार का? हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

12 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांची बांद्रा पश्चिम येथील ताज लँड्स एंड येथे अचानक भेट झाल्याने मनसे आणि भाजपची युती होणार असल्याची चर्चा सर्वत्र होत होती. अशातच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील राज ठाकरे यांना सोबत घेण्यासाठी मोठा डाव मांडला असून युतीच्या 'उदया'साठी सामंतांवर जबाबदारी सोपवली आहे.

युतीच्या 'उदया'साठी 'सामंतां'वर जबाबदारी:

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज ठाकरे यांना महायुतीत आणण्यासाठी उदय सामंतांवर जबाबदारी सोपवली आहे. काही दिवसांपूर्वी उदय सामंत यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी स्नेहभोजनासाठी भेट दिली होती. तेव्हापासून मनसे आणि शिंदे गटात चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज ठाकरे यांना स्नेहभोजनासाठी निमंत्रण पाठवले जाणार आहे. या भेटीमुळे मनसे आणि शिंदे गटाच्या युतीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळू शकतो.


सम्बन्धित सामग्री