Wednesday, June 18, 2025 02:41:22 PM

कारखाना चालवण्याची धमक असलेल्यांनाच मतदान करा; उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मतदारांना आवाहन

रविवारी, इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होत आहे. मतदारांसोबत संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, 'ज्यांच्याकडे साखर कारखाना चालवण्याची धमक आहे, तुम्ही त्यांनाच मतदान करा'.

कारखाना चालवण्याची धमक असलेल्यांनाच मतदान करा उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मतदारांना आवाहन

बारामती: रविवारी, इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होत आहे. मात्र, या निवडणुकीच्या मतदानादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील एकत्र येताना दिसले. तेव्हा, अजित पवारांनी त्यांच्या अनोख्या शैलीत हर्षवर्धन पाटलांना म्हणाले की, 'नमस्ते पाटील साहेब, लक्ष असुद्या आमच्यावर'. यावर हर्षवर्धन पाटील हसत उत्तर दिले की, 'चांगलं लक्ष ठेवलंय की'. तसेच, मतदारांना आवाहन देत अजित पवार म्हणाले की, 'ज्यांच्यामध्ये कारखाना व्यवस्थित चालवायची धमक आहे, त्यांनाच मतदान करावं'. 

धमक असलेल्यांनाच मतदान करा:

मतदारांसोबत संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, 'ज्यांच्याकडे साखर कारखाना चालवण्याची धमक आहे, तुम्ही त्यांनाच मतदान करा'. तसेच, त्यांनी असेही नमूद केले की, 'ही निवडणूक फक्त राजकीय नसून आर्थिकदृष्ट्या खूप महत्वाची आहे', असे स्पष्ट केले. 'ही एकतर्फी निवडणूक नाही. आम्ही प्रत्येक निवडणूक तुल्यबळ समजून लढतो', असे अजित पवार म्हणाले. 

कारखाण्यासोबत जोडलेली पवार कुटुंबीयांची नाळ:

'मी, माझे वडील, माझे आजोबा असा आमचा संपूर्ण परिवार या कारखान्याचे सभासद आहेत. त्यामुळे हा कारखाना आमच्यासाठी फक्त राजकीय नसून, आर्थिक दृष्टीने देखील ५३ गावांसाठी अत्यंत महत्वाचा आहे', असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. 

उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनेत्रा पवार, आशाताई पवार यांनी छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदान केले. यावेळी आईसोबत स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. तसेच, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या कारखान्यासाठी 'ब' वर्गातून मतदानाचा हक्क बजावला आहे.
 


सम्बन्धित सामग्री