Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; 45 मिनिटे पाहिली वाट, नंतर केला रस्तेमार्गे प्रवास

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पुन्हा एकदा तांत्रिक बिघाड झाल्याने खळबळ उडाली. सध्या एकनाथ शिंदे हे गुजरात दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली. वडनगरहून अहमदाबादला जाण्याआधी हेलिकॉप्टरमधील बिघाड समोर आला असून त्यावेळी हेलिकॉप्टरने जाणं रद्द करून उपमुख्यमंत्री शिंदे हे रस्तेमार्गे गाडीने अहमदाबादला रवाना झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या […]

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; 45 मिनिटे पाहिली वाट, नंतर केला रस्तेमार्गे प्रवास

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पुन्हा एकदा तांत्रिक बिघाड झाल्याने खळबळ उडाली. सध्या एकनाथ शिंदे हे गुजरात दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली. वडनगरहून अहमदाबादला जाण्याआधी हेलिकॉप्टरमधील बिघाड समोर आला असून त्यावेळी हेलिकॉप्टरने जाणं रद्द करून उपमुख्यमंत्री शिंदे हे रस्तेमार्गे गाडीने अहमदाबादला रवाना झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मस्थळ असलेल्या वडनगर येथे आयोजित कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे गुजरातमध्ये गेले होते. वडनगरहून अहमदाबादला हेलिकॉप्टरने जाण्याचे नियोजन होते. मात्र, हेलिकॉप्टरच्या तपासणीदरम्यान तांत्रिक बिघाड लक्षात आला. वडनगर हेलिपॅडवर 45 मिनिटं वाट पाहिली. त्यानंतर पायलटने उड्डाण न करण्याचा निर्णय घेतल्याने पुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी गाडीने अहमदाबादकडे प्रस्थान केले. 

हेही वाचा : Crime News: वडिलांना वाचवायला धावली अन् जिवाला मुकली; जमिनीच्या वादातून सख्ख्या भावांनी बाप-लेकीला संपवलं

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number