Sunetra Pawar : तटकरे-पटेलांचा ‘तो’ प्लॅन फोल ठरणार? राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेताच सुनेत्रा पवारांची महत्त्वाची भूमिका

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेताच सुनेत्रा पवारांनी मोठी भूमिका बजावली आहे.

Sunetra Pawar : तटकरे-पटेलांचा ‘तो’ प्लॅन फोल ठरणार? राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेताच सुनेत्रा पवारांची महत्त्वाची भूमिका

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेताच सुनेत्रा पवारांनी मोठी भूमिका बजावली आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी 10 मार्चला निवडणूक आयोगाला पत्र दिलं होतं. त्या पत्रातून सुनेत्रा पवारांनी राष्ट्रवादीतील इतर नेत्यांना सूचक इशारा दिला असल्याचे पाहायला मिळत आहे. ’28 जानेवारीनंतर निवडणूक आयोगाशी झालेला पक्षाचा कुठलाही पत्रव्यवहार वैध धरु नये, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून यापुढे मी जो पत्रव्यवहार करेन तोच वैध धरावा’ अशी मागणी सुनेत्रा पवार यांनी पत्रात नमूद केली होती.

हेही वाचा- Ashok Kharat Case : खरातचं गुन्हेगारी क्षेत्रातील पहिलं हत्याकांड ते अनेक बड्या अधिकाऱ्यांना 2 कोटी देणं; राष्ट्रवादीच्या नेत्याचा सनसनाटी दावा

तसेच पत्रातून 26 फेब्रुवारीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची माहिती दिली होती. दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील नेते रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर अनेकदा तटकरे आणि पटेल यांच्या विरोधात वक्तव्य केले आहेत. त्यांनी असं देखील म्हटलं होत की, अजित पवार यांच्या निधनानंतर तटकरे-पटेल यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर वर्चस्व मिळवायचे होते. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या पत्रानंतर तटकरे आणि पटेल यांच्या पक्ष ताब्यात घेण्याच्या प्रयत्नांना धक्का बसणार का? अशी चर्चा मोठ्या प्रमाणात केली जात आहे. 

हेही वाचा- Swami Avimukteshwaranand Saraswati: ‘या’ प्रकरणात स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींना मोठा दिलासा; न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

मंगळवारी ‘देवगिरी’ निवासस्थानावर झालेल्या बैठकीला सुनील तटकरे यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते, तसेच त्याच्या दुसऱ्याच दिवशी सुनेत्रा पवार यांनी आयोगाला पत्र पाठवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रामुळे पक्षातील दिग्गज नेत्यांमध्ये खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number