मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील प्रकृती अस्वस्थ असूनही त्यांनी नुकताच मोठे आवाहन केले. मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी तात्पुरता रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला आहे. त्यांनी मराठा समाजाला एकजूट राहण्याचे आणि कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा समाजाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येकाने आपला अर्ज घेऊन अंतरवालीमध्ये येण्यास सांगितले आहे. मनोज जरांगे देखील अंतरवालीकडे निघाले आहेत. यावेळी त्यांनी मोठा इशारा दिला आहे.
यावेळेस मनोज जरांगे म्हणाले की, “58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र जाणीवपूर्वक दिले जात नाही. यांनी सर्वच लोकांवर अन्याय केले. बावनकुळे आणि शिरसाट यांनी मराठा समाज उध्वस्त करण्याचे ठरवले आहे, त्यांना 28 तारखेपर्यंत वेळ दिला आहे. हैदराबाद गॅझेटनुसार सर्वांना प्रमाणपत्र घ्यायचे आहे. ज्यांची निवड झाली त्यांनी आपला अर्ज घेऊन यावे, तुम्ही येऊ शकत नसेल तर मुलाला पाठवून द्यावे… नियुक्ती घेतल्या शिवाय जायचे नाही. नंतर आले नाही तर माझ्या नावाने बोंबलू नका. नियुक्ती होईपर्यंत घरी जायचे नाही. ज्यांनी कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज केला आहे, त्यांनी कुणाकडे अर्ज केलाय, कुणाच्या अधिकाऱ्याकडे अर्ज आहे, माहिती घेऊन अंतरवली येथे यायचे, जोपर्यंत प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत अंतरवली सोडायची नाही… ज्यांनी हैदराबाद गॅझेटनुसार अर्ज केलाय आणि अधिकारी प्रमाणपत्र देत नाही, त्यांनी देखील आपली माहिती घेऊन अंतरवलीत यायचे आहे. कुणीही मागे राहायचं नाही.”
“अण्णासाहेब महामंडळ अंतर्गत ज्यांचे अर्ज बाकी आहे, किंवा परतावा येत नाही यांनी देखील संपूर्ण माहिती घेऊन अर्ज घेत अंतरवलीला यायचे आहे… बाकी सारतीचे जेवढ्या योजना आहे, त्यांना देखील जया अडचणी असतील त्यांनी देखील अंतरवलीला यायचे आहे… काहींना आपल्यामधील लोक याना समाजाचे देणंघेणं नाही… सारथी कोणत्या योजना बंद झाल्या त्याची माहिती घेऊन यायचे आहे, अर्जदारसाठी वेगळी आणि अभ्यासकसाठी जागा असणार आहे. मीडियात बोबलायचे नाही, इकडे शहाणपण चालणार नाही, काही जण बैठक उधळण्यासाठी येतात…. ओबीसींना काय सुरू आहे आणि मराठ्यांना काय नाही सर्व सुरू करून घाययाचे आहे…”
“आपण उन्हात आंदोलन केले सरकारने ओबीसी जीआर काढला, पण अजून अंमलबजावणी नाही, शिंदे फडणवीस पागल समजता का? तुम्हाला राजकारणातून संपवू… ज्यावेळी तुम्ही दिले म्हटले तेव्हा आम्ही दिले म्हटले, प्रताप सरनाईक ,उदय सामंत यांनी बलिदान गेलेल्या कुटुंबासाठी जीआर काढला, बाकीने काढले का? तुम्ही मला आंदोलन सुरू झाल्यावर 6 महिन्यात गुन्हे मागे घेणार म्हणाले, घेतले का? आता पुन्हा भानगडी करू नका, वेळप्रसंगी डाव फिरवू शकतो, गरज पडल्यास आंदोलन मुंबईत देखील होऊ शकते. विदर्भातील घराघरात बैठक घेऊन, 29 तारखेला आंदोलनात यावे, काही अभ्यासक यांनी नीट वागायचे असल्यास इकडे यायचे, नाहीतर येऊ नका, विष कालवण्यासाठी येऊ नका.”