Devendra Fadnavis : ‘कितीही टिंगल-टवाळी केली….टोमणे मारले, तरी लोकं कामं लक्षात ठेवतात’; देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना सणसणीत उत्तर

मुंबई : मुंबई महापालिकांसह राज्यातील २९ महापालिकेसाठी मतदान प्रक्रिया येत्या १५ रोजी पार पडणार आहे. या निमित्ताने जय महाराष्ट्र न्यूज चॅनेलनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत खास बातचीत केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी टोमणे मारणाऱ्या विरोधकांना चांगलचं सुनावलं. मुंबईतील नागरी सुविधांच्या प्रकल्पांबाबत उद्धव ठाकरे यांची शिवसेना तसेच मनसे व इतर विरोध पक्ष यांनी भाजपवर ताशेरे ओढले आहेत. ठाकरेंनी यंदा होय, […]

Devendra Fadnavis : ‘कितीही टिंगल-टवाळी केली….टोमणे मारले, तरी लोकं कामं लक्षात ठेवतात’; देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना सणसणीत उत्तर

मुंबई : मुंबई महापालिकांसह राज्यातील २९ महापालिकेसाठी मतदान प्रक्रिया येत्या १५ रोजी पार पडणार आहे. या निमित्ताने जय महाराष्ट्र न्यूज चॅनेलनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत खास बातचीत केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी टोमणे मारणाऱ्या विरोधकांना चांगलचं सुनावलं. मुंबईतील नागरी सुविधांच्या प्रकल्पांबाबत उद्धव ठाकरे यांची शिवसेना तसेच मनसे व इतर विरोध पक्ष यांनी भाजपवर ताशेरे ओढले आहेत. ठाकरेंनी यंदा होय, हे आम्ही केलंय… असे बॅनरदेखील लावले आहेत. त्यातचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरातही समुद्र आणू शकतात, असा टोलाही विरोधकांनी त्यांना लगावला होता. या सर्व टीकांवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले की, कोणी कितीही टिंगल केली, टिका केली, टोमणे मारले तरी लोकं कामं लक्षात ठेवतात. टीका लक्षात ठेवत नाही. मी अशांना टोमणे बहाद्दर म्हणतो. माझी ओळख ही इन्फ्रामॅन म्हणून झाली आहे. त्यामुळे त्यांच्या टीकेकडे मी लक्ष देत नाही. मुंबई दोन नागपूरकरांना कायम लक्षात ठेवेलं. एक नितीन गडकरी दुसरा मी, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

हेही वाचा : Ajit Pawar : ‘दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार?’; अजित पवारांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number