राज्यसभा उमेदवारीवरून भाजपमध्ये असंतोष; माजी खासदार करणार पक्षाला रामराम? सोशल मीडियावरील ‘टाटा-बाय-बाय’ पोस्टने खळबळ

राज्यसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारांची अधिकृत यादी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर पक्षात अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे.
राज्यसभा उमेदवारीवरून भाजपमध्ये असंतोष; माजी खासदार करणार पक्षाला रामराम? सोशल मीडियावरील ‘टाटा-बाय-बाय’ पोस्टने खळबळ
Dharmendra Kashyap

राज्यसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारांची अधिकृत यादी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर पक्षात अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. उत्तर प्रदेशातील बरेली क्षेत्रातील भाजपचे माजी खासदार धर्मेंद्र कश्यप यांच्या एका अनपेक्षित सोशल मीडिया पोस्टमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कश्यप यांनी आपल्या फेसबूक प्रोफाईलवरून “टाटा-बाय-बाय” (Tata-Bye-Bye) असा संक्षिप्त संदेश पोस्ट केला आहे. पक्षाकडून दुर्लक्ष झाल्याच्या भावनेतून त्यांनी भाजपला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून, या घटनेनंतर त्यांच्या निवासस्थानी समर्थक व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली आहे.

मुलीच्या राजकीय पदार्पणासाठी आग्रही; समाजवादी पक्षात प्रवेशाची शक्यता

मिळालेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र कश्यप हे आपली कन्या किर्ती कश्यप यांना राजकारणात सक्रिय करण्यासाठी गेल्या काही काळापासून प्रयत्नशील होते. किर्ती यांच्या उमेदवारीसाठी त्यांनी पक्षाकडे राजकीय मोर्चेबांधणी केली होती. मात्र, पक्षाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने आणि राज्यसभेची उमेदवारीही न मिळाल्याने ते कमालीचे नाराज झाले आहेत. कश्यप हे लवकरच समाजवादी पक्ष (SP) किंवा इतर एखाद्या प्रमुख राजकीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधून प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा –  दिल्लीत ‘इंडिया’ आघाडीचं आक्रमक आंदोलन; पोलिसांच्या वर्तनावर प्रियंका गांधींचा मारहाणीचा आरोप

बहुजन समाज पक्ष ते भाजप असा राजकीय प्रवास

धर्मेंद्र कश्यप यांचा राजकीय प्रवास विविध राजकीय पक्षांतून झाला आहे. 2002 मध्ये त्यांनी बहुजन समाज पक्षाच्या (BSP) तिकिटावर आमदारकी जिंकली होती. त्यानंतर 2003 मध्ये त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश करत राज्यमंत्रीपद भूषवले. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत आंवला मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला होता. पुढे त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि 2014 व 2019 च्या निवडणुकांमध्ये भाजपच्या तिकिटावर खासदार म्हणून विजय मिळवला. मात्र, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचे उमेदवार नीरज मौर्य यांनी त्यांचा 15,970 मतांच्या फरकाने पराभव केला होता. या पराभवानंतर कन्या किर्ती यांच्या राजकीय भविष्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version