TMC Split: दीदींची डोकेदुखी वाढली! पश्चिम बंगालमध्ये ‘महाराष्ट्र पॅटर्न’ची पुनरावृत्ती? तृणमूल काँग्रेसमध्ये मोठ्या फुटीचे संकेत

सत्ता गमावल्यानंतर आधीच बॅकफूटवर गेलेल्या तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षाला आता अंतर्गत बंडखोरीचा मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत.

TMC Split: दीदींची डोकेदुखी वाढली! पश्चिम बंगालमध्ये ‘महाराष्ट्र पॅटर्न’ची पुनरावृत्ती? तृणमूल काँग्रेसमध्ये मोठ्या फुटीचे संकेत

TMC Split: महाराष्ट्रात ज्याप्रमाणे महाविकास आघाडीचे सरकार पाडून एका रात्रीत राजकीय भूकंप झाला, तसाच काहीसा थरार आता पश्चिम बंगालच्या राजकारणात घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सत्ता गमावल्यानंतर आधीच बॅकफूटवर गेलेल्या तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षाला आता अंतर्गत बंडखोरीचा मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत. पक्षातील प्रचंड नाराजीमुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अडचणीत कमालीची वाढ झाली आहे. टीएमसीचे तब्बल 50 ते 60 आमदार सध्या बंडाच्या पवित्र्यात असून, बंगालमध्ये थेट 'महाराष्ट्र पॅटर्न' राबवला जाण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेनेप्रमाणेच तृणमूल काँग्रेसमध्येही उभी फूट पाडून मूळ पक्ष आणि चिन्हावर हक्क सांगण्याची रणनीती बंडखोरांनी आखल्याचे बोलले जात आहे.

ऋतब्रत बॅनर्जी बनणार बंगालचे 'एकनाथ शिंदे' 

या संभाव्य राजकीय भूकंपाचे केंद्रबिंदू नुकतेच टीएमसीमधून निलंबित झालेले नेते ऋतब्रत बॅनर्जी हे असण्याची दाट शक्यता आहे. पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर ऋतब्रत बॅनर्जी आणि संदीपान साहा या दोन्ही नेत्यांनी पक्षाच्या अधिकृत कार्यक्रमांकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांना सोबत घेऊन नवीन गट स्थापन केला, अगदी त्याच धर्तीवर ऋतब्रत बॅनर्जी हे देखील नाराज आमदारांची मोट बांधून पश्चिम बंगालचे 'एकनाथ शिंदे' बनण्याच्या तयारीत असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. या बंडखोर गटाने आता तृणमूलच्या नेतृत्वाविरुद्ध उघडपणे शड्डू ठोकण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा – Annamalai: आता वेगळी वाट! भाजपची मोठी ऑफर नाकारून अण्णामलाईंची नवी रणनिती; तामिळनाडूत खळबळ

कोलकाता आमदार निवासात गुप्त बैठका 

ममता बॅनर्जी यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या आमदारांचे कोलकाता येथील शासकीय आमदार निवासात गेल्या काही दिवसांत अनेक गुप्त बैठकांचे सत्र पार पडले आहे. या अंतर्गत बैठकांमध्ये पक्षाचे भवितव्य, संघटनात्मक बदल आणि नवीन राजकीय पर्यायांवर सखोल मंथन झाले. सध्याच्या नेतृत्वावर दबाव आणण्यासाठी सुमारे 15 ते 20 विद्यमान आमदार या बंडखोर नेत्यांच्या थेट संपर्कात आहेत. हे सर्व असंतुष्ट नेते एकत्र येऊन 'असली तृणमूल' किंवा 'रिअल तृणमूल' नावाचा एक नवीन स्वतंत्र राजकीय मंच स्थापन करण्याच्या अंतिम टप्प्यात आहेत. विशेष म्हणजे, आपल्या पायाखालची वाळू सरकत असल्याच्या या मोठ्या राजकीय धक्क्याची पूर्वकल्पना स्वतः ममता बॅनर्जी यांनाही आल्याचे समजते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number