Manoj Jarange Patil: ‘लाडक्या दाजींकडून पैसे वसूल करू नका…’; मनोज जरांगे पाटलांची सरकारकडे मागणी

अंदाजे 14,000 पुरुषांनी महिलांच्या नावावर योजनेचे पैसे काढल्याच्या मुद्द्यावर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या खास शैलीत सरकारवर निशाणा साधला.

Manoj Jarange Patil: ‘लाडक्या दाजींकडून पैसे वसूल करू नका…’; मनोज जरांगे पाटलांची सरकारकडे मागणी

Manoj Jarange Patil: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त झालेल्या काही कथित गैरव्यवहारांवरून आता राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच तापू लागलं आहे. या योजनेचा गैरफायदा घेत काही पुरुषांनी म्हणजेच ‘दाजींनी’ महिलांच्या नावावर पैसे उचलल्याचा प्रकार समोर आल्यानंतर, सरकार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई आणि पैशांची वसुली करण्याच्या तयारीत आहे. मात्र, या मुद्द्यावर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उडी घेतली असून, त्यांनी सरकारला या ‘लाडक्या दाजीं’वर गुन्हे दाखल न करण्याची आणि त्यांच्याकडून वसुली न करण्याची गळ घातली आहे.

“तो पण लाडक्या बहिणीचाच दाजी आहे ना…”
अंदाजे 14,000 पुरुषांनी महिलांच्या नावावर योजनेचे पैसे काढल्याच्या मुद्द्यावर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या खास शैलीत सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, “14,000 दाजींनी महिलांच्या म्हणजेच लाडक्या बहिणीच्या नावावर पैसे काढले, म्हणून आता सरकार त्या लाडक्या दाजींकडून पैसे वसूल करणार असल्याचे समजते. पण विचार करा, तो पण लाडक्या बहिणीचाच दाजी आहे ना! जरी दाजीने पैसे काढले असले, तरी ती अखेर दाजीचीच बायको आहे. त्यामुळे या पैशांवरून वाद घालू नका.”

हेही वाचा – Vidhan Parishad Election: विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा मास्टरस्ट्रोक! रवींद्र चव्हाणांनी जाहीर केली उमेदवारांची यादी

गुन्हे दाखल केल्यास बहिणींना त्रास होण्याची भीती
सरकारने या प्रकरणात जास्त कडक भूमिका घेऊ नये, अशी मागणी करत जरांगे पाटील पुढे म्हणाले की, “दाजींनी तुमचे काय वाटोळे केले आहे? एवढ्या वेळेस त्यांना सोडून द्या. त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नका.” जर सरकारने या पुरुषांवर पोलीस कारवाई केली, तर त्याचे पडसाद घरात उमटू शकतात, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. “तुम्ही दाजींवर कारवाई केली, तर ते घरी जाऊन तुमच्याच लाडक्या बहिणींना त्रास देतील. सरकारला खरोखरच असं वाटतं का की आपल्या बहिणींना त्रास व्हावा?” असा भावनिक प्रश्नही त्यांनी सरकारला विचारला.

सरकारला लगावला टोला
या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला एक राजकीय टोलाही लगावला. “एखादा दाजी अडमूठा असतो, त्यामुळे त्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष केलेले बरे,” असे म्हणत त्यांनी या विषयावर मिश्किल टिप्पणी केली. एकूणच, लाडकी बहीण योजनेवरून सुरू असलेल्या या नव्या वादात आता जरांगे पाटलांच्या या विधानामुळे आणखी रंगत आली असून, सरकार यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number