Wednesday, July 09, 2025 08:21:06 PM

पुन्हा अशा गोष्टी करू नका; महाराष्ट्रातील जनतेचं अभिनंदन करत राज ठाकरेंचा सरकारला इशारा

सरकारने हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द केला आहे. याबद्दल मनसे नेते राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेचं अभिनंदन केलं आहे.  हिंदीबाबतचे दोन्ही जीआर सरकारकडून रद्द करण्यात आले आहेत.

पुन्हा अशा गोष्टी करू नका महाराष्ट्रातील जनतेचं अभिनंदन करत राज ठाकरेंचा सरकारला इशारा

मुंबई: सरकारने हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द केला आहे. याबद्दल मनसे नेते राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेचं अभिनंदन केलं आहे.  हिंदीबाबतचे दोन्ही जीआर सरकारकडून रद्द करण्यात आले आहेत. साहित्यिक आणि मोजक्या कलावंतांचे देखील आभार राज यांनी व्यक्त केले आहेत. तसेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचेही आभार मानले आहेत. 

'पुन्हा अशा गोष्टी करू नका, राज ठाकरेंचा सरकारला इशारा'
सरकारने हिंदी भाषा सक्ती रद्द केल्यानंतर राज यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ऐकून घेईन पण ऐकणार नाही असे भुसेंना सांगितल्याचे राज ठाकरे म्हणाले. पुन्हा अशा गोष्टी करू नका असा थेट इशारा राज ठाकरेंनी सरकारला दिला आहे. हिंदी प्रांत भाषा, राष्ट्रीय भाषा नाही. पाच तारखेला विजयी मेळावा होणार आहे. हा विजय मराठी माणसाचा आहे. मराठीबाबत तोडजोड नसल्याचे त्यांनी म्हटले.  ठाकरेंच्या काळातील जीआर हा उच्च शिक्षणासाठी होता असे म्हणत राज ठाकरेंकडून भावाची पाठराखण  करण्यात आली आहे. समितीशी देणंघेणं नाही असेही ते म्हणाले. 

हेही वाचा: हिंदी सक्तीचा निर्णय रद्द झाल्यानं मविआत आनंद; विधानभवन परिसरात टाळ वाजवून व्यक्त केला आंनद

'सरकारला दोन्ही जीआर रद्द करायला भाग पाडले...'
महाराष्ट्र सरकारला दोन्ही जीआर रद्द करायला भाग पाडले यासाठी राज यांनी तमाम जनतेचे अभिनंदन व्यक्त केले. हा विषय क्रेडिटचा नाही पण विषय निघाल्यावर विरोध केला. पत्र लिहिली, वातावरण तापले आणि सर्व राजकीय पक्ष, ठाकरे गट, पवार गटानेही पाठिंबा दिला असे राज यांनी सांगितले. आधी 6 तारीख होती मग 5 तारीख केली. संयुक्त महाराष्ट्राची ताकद दिसून आली होती. सरकार परत अशा भानगडीत पडणार नाही अशी आशा बाळगतो. दादा भुसे आल्यावर म्हणाले की ऐकून घ्या. ऐकून घेणार पण ऐकणार नाही असे म्हणाल्याचे ठाकरेंनी सांगितले. 

'विजयी मेळाव्याला राजकीय लेबल लावायचे नाही'
राज ठाकरे म्हणाले, आमच्या अभ्यासात 5 वी नंतर हिंदी आणि संस्कृत असले विषय होते, आम्ही शिकलो. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही प्रांतभाषा आहे. उत्तर भारतातील अनेक लोक जर महाराष्ट्रात नोकरीसाठी येत असतील तर तिथे मराठी शिकवायला हवे. 150 वर्षे जुनी भाषा 3 हजार वर्षे जुन्या भाषेला मारत असेल तर असे होणार नाही. मला संजय राऊत यांचा कॉल आला की विजयी मेळावा करावा. तो मेळावा जरी झाला तरी त्यात राजकीय लेबल लावायचे नाही कारण तो मराठी माणसांचा मेळावा आहे असे राज यांनी सांगितले. 


सम्बन्धित सामग्री