Thackeray Brothers Joint Protest: निवडणूक आयोगाच्या भूमिकेविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार; ‘या’ तारखेला मुंबईत भव्य संयुक्त जनमोर्चा

मोर्चाच्या आयोजनाबाबत स्पष्टीकरण देताना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील आयोग सत्ताधारी पक्षाच्या शाखेप्रमाणे काम करत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला.

Thackeray Brothers Joint Protest: निवडणूक आयोगाच्या भूमिकेविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार; ‘या’ तारखेला मुंबईत भव्य संयुक्त जनमोर्चा
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ठाकरे बंधूंनी थोपटले दंड

Thackeray Brothers Joint Protest: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर आणि कामकाज पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकार व प्रशासनाविरोधात एकत्र लढा देण्याची घोषणा केली आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान ‘एसआयआर’ (SIR) उपक्रमाच्या नावाखाली लाखो मतदारांची नावे मतदार यादीतून गायब झाल्याचा आरोप करत दोन्ही पक्षांनी येत्या 4 ऑक्टोबर 2026 रोजी मुंबईत भव्य संयुक्त जनमोर्चा आयोजित केला आहे. दोन आयुक्तांनी मांडलेल्या 14 अंतर्गत आक्षेपांनंतर निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर राजकीय वर्तुळात संशयाचे वातावरण निर्माण झाले असून, त्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंचा हा संयुक्त एल्गार राजकीय पटलावर अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

हा केवळ एका पक्षाचा नाही तर लोकशाही वाचवणारा जनमोर्चा

मोर्चाच्या आयोजनाबाबत स्पष्टीकरण देताना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील आयोग सत्ताधारी पक्षाच्या शाखेप्रमाणे काम करत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. या मोर्चाचा पुढाकार मनसे आणि शिवसेनेने घेतला असला, तरी हा कोणत्याही एका पक्षाचा किंवा राजकीय विचारसरणीचा विषय नसून देशातील लोकशाही आणि संविधान वाचवण्याचा संघर्ष आहे, असे त्यांनी नमूद केले. त्यामुळे या जनमोर्च्यात महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी, सामाजिक संघटनांनी आणि आम जनतेने पक्षभेद बाजूला सारून मोठ्या  संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा – MPSC पेपरफुटी प्रकरण; ‘मैत्रीत आंधळे होऊन दुर्योधनाला पाठीशी घालू नका’, रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार

हिंदी सक्तीनंतर पुन्हा एकदा ठाकरे बंधूंचे एकत्र आंदोलन

यापूर्वी महाराष्ट्रातील हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येत भव्य मोर्चाचे आयोजन केले होते. त्यानंतर आता थेट निवडणूक आयोगाच्या कारभाराविरुद्ध त्यांनी दंड थोपटले आहेत. 4 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या आंदोलनाची वेळ आणि मार्ग याविषयीची माहिती लवकरच प्रसिद्ध केली जाईल, असे दोन्ही पक्षांच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. या संयुक्त आंदोलनामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number