Maratha Reservation: ‘एकतर सरकार झुकेल, नाहीतर माझा जीव जाईल…’; मनोज जरांगेंची 30 मेपासून रखरखत्या उन्हात आमरण उपोषणची घोषणा

सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर आता 30 मेपासून कठोर आमरण उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

Maratha Reservation: ‘एकतर सरकार झुकेल, नाहीतर माझा जीव जाईल…’; मनोज जरांगेंची 30 मेपासून रखरखत्या उन्हात आमरण उपोषणची घोषणा

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आंदोलन छेडणारे मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारविरोधात पुन्हा आक्रमक भूमिका घेत निर्णायक इशारा दिला आहे. सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर आता 30 मेपासून कठोर आमरण उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. हे आंदोलन पूर्वीप्रमाणे मंडपात किंवा सावलीत नसून थेट कडक उन्हात होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आरपारची लढाई होणार – जरांगे पाटील
गेल्या दहा महिन्यांत सरकारकडून केवळ आश्वासनं मिळाली, मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस अंमलबजावणी झाली नाही, अशी नाराजी जरांगे यांनी व्यक्त केली. त्यामुळे आता संघर्ष अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे सांगत त्यांनी ‘यावेळी आरपारची लढाई होईल,’ असा इशारा दिला.

ना फॅन, ना मंडप, ना पाणी आणि ना पायात चप्पल
उपोषणादरम्यान कोणतीही सुविधा न घेण्याचा निर्धार त्यांनी जाहीर केला आहे. ना फॅन, ना मंडप, ना पाणी आणि ना पायात चप्पल अशा परिस्थितीत हे आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मे महिन्यातील तीव्र उन्हात उपोषण करताना जीवाला काही धोका निर्माण झाला, तर त्याला राज्य सरकार जबाबदार असेल, असा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा – Milind Narvekar : फडणवीस आणि ठाकरे गटाचा वाढता समन्वय, नार्वेकरांचा एक फोन आणि मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल; शिंदे गटाला झटका

काहीही झाले तरी आंदोलन मागे घेणार नाही
स्वतःची प्रकृती आधीच खालावलेली असल्याचे सांगताना जरांगे म्हणाले की, समाजातील तरुणांचे भविष्य धोक्यात असताना आता मागे हटण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे काहीही झाले तरी आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून हालचाली सुरू झाल्या असून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड हे जरांगे यांची भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, चर्चेपेक्षा प्रत्यक्ष निर्णय आणि आरक्षणाची अंमलबजावणी हवी, असे जरांगे यांनी स्पष्ट केले.

मराठा समाजाला निवडणुकांच्या वेळी महत्त्व दिले जाते, पण आरक्षणाच्या प्रश्नावर मात्र दिरंगाई केली जाते, अशी टीका त्यांनी केली. 58 लाख नोंदी सापडूनही प्रमाणपत्र आणि वैधतेबाबत निर्णय होत नसल्याचा सवालही त्यांनी उपस्थित केला. सातारा गॅझेट लागू करण्यास होणारा विलंब आणि मराठा-कुणबी संदर्भातील निर्णय रखडल्याबद्दल त्यांनी सरकारवर निशाणा साधला. “1967 पासून मराठा समाजावर अन्याय झाला, त्याची भरपाई कोण करणार?” असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी आता शेवटपर्यंत संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला. 30 मेपासून आंदोलन अधिक तीव्र होणार असल्याने राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number