दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिंदेंचा मोठा प्लॅन, दसरा मेळाव्यात महत्त्वाचं वक्तव्य

Eknath Shinde : दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचं आश्वासन दिलं. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ देणार नाही, असं सांगत त्यांनी मदतीसाठी मोठी घोषणा केली.
दसरा मेळावा
Eknath Shinde

दसरा सोहळ्यानिमित्त व्यावसपीठावर येताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा मांडला. शिवसेनेला 60 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा मांडली. आपला लाडका शेतकरी आज संकटात आहे. महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे, असे म्हणत शिंदे यांनी सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या.

दुष्काळग्रस्त भागातील सर्वांनी आपापल्या मतदारसंघात थांबून शेतकऱ्यांना मदत करावी, मेळाव्यासाठी येऊ नका, तर शेतकऱ्यांच्या दराता तोरण बांधा, असे आवाहनही त्यांनी केले. मागच्या वर्षी अतिवृष्टीने हाहाकार माजवला होता. जमी खरडून गेली, पिकं वाहून गेली, गुरं-ढोरं वाहून गेली, तेव्हाही शिवसैनिक शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला, याची आठवण त्यांनी करुन दिली.

या पार्श्वभूमीवर आज सकाळीच दिवाळीचा शिधा असलेले तब्बल 100 ट्रक दुष्काळी भागाकडे रवाना करण्यात आले आहेत. तिथे त्याचं वाटप होईल. ही पहिली खेप असून आणखी दुसरी, तिसरी फेरीही होणार आहे. शेतकऱ्यांची दिवाळी आम्ही काळी होऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.दुष्काळग्रस्त भागातील मुलांच्या शिक्षणाची आणि मुलींच्या लग्नाची जबाबदारी शिवसेनेने घेतली आहे. आम्ही फक्त भाषण देणारे नाही, तर शेतकऱ्यांना रेशन देणारे आणि त्यांचे अश्रू पुसणारे आहोत, असं म्हणत शिंदे यांनी आपल्या दौऱ्याचा उल्लेख केला.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version