अनंत चतुर्दशीनिमित्त मुंबईतील कृत्रिम विसर्जन स्थळे, चौपाटी व समुद्र किनाऱ्यावर भाविकांच्या गर्दीचे लोट पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरगाव चौपाटीवर विसर्जनाच्या वेळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भक्तांची गर्दी, दर्शन सोहळे आणि विसर्जन मिरवणुका सुनियोजित करण्यासाठी संबंधित पोलीस प्रशासन व गणेश मंडळांचे आभार व्यक्त केले.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
मुंबईत ठिकठिकाणी, अगदी गल्लोगल्ली बाप्पा विराजमान झालेले आहेत, त्यामुळे विसर्जनाच्या वेळी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. मात्र ही प्रचंड गर्दी अगदी शिस्तीत सांभाळल्याबद्दल आणि कुठेही गैरप्रकार न होता, कोणालाही त्रास होणार नाही अशा प्रकारे नियोजन केल्याबद्दल मुंबई महापालिका आयुक्त, वाहतूक पोलीस अधिकारी व सहकारी, मुंबई पोलीस अधिकारी व सहकारी तसेच सर्व गणेश मंडळांचे आभार व्यक्त करत त्यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी त्यांना शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दल विचारले असता, एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्ही बांधावर जाऊन सर्व गोष्टींची पडताळणी केली आहे, याविषयी लवकरच निर्णय घेऊ. विघ्नहर्ता सगळं दुःख दूर करणार आहे, बळीराजाच्या मागे सरकार खंबीरपणे उभं आहे.” यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.
सिल्वर ओकवर पवार कुटुंबीयांची खलबतं; सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी चर्चा?
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.