Maharashtra Bye-Elections 2026: राज्यात पुन्हा निवडणुकांची रणधुमाळी; राहुरी आणि बारामतीसाठी मोठी अपडेट समोर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेली बारामती आणि भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेली राहुरी या दोन जागांवर ही निवडणूक पार पडणार आहे.<br/>

Maharashtra Bye-Elections 2026: राज्यात पुन्हा निवडणुकांची रणधुमाळी; राहुरी आणि बारामतीसाठी मोठी अपडेट समोर

Maharashtra Bye-Elections 2026: राज्यातील विधानसभा आणि लोकसभेच्या मोठ्या निवडणुकांचे वारे शांत होत असतानाच आता पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची घोषणा येत्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेली बारामती आणि भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेली राहुरी या दोन जागांवर ही निवडणूक पार पडणार आहे.

पाच राज्यांच्या निवडणुकांसोबतच घोषणा होणार?
निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात या पोटनिवडणुकीचे वेळापत्रक समोर येऊ शकते. आगामी काळात पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. याच निवडणुकांच्या तारखांसोबत महाराष्ट्रातील या दोन जागांसाठी मतदानाची घोषणा केली जाण्याची दाट शक्यता आहे.

बारामतीतून सुनेत्रा पवार मैदानात
अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीच्या जागेवर आता सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झाले आहे. सध्या राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळत असलेल्या सुनेत्रा पवार यांना सहा महिन्यांच्या आत विधिमंडळाचे सदस्य होणे घटनात्मकदृष्ट्या अनिवार्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असून, खासदार सुप्रिया सुळे यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

राहुरीमध्ये भाजपची रणनीती काय?
दुसरीकडे, अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी मतदारसंघाचे भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे गेल्या ऑक्टोबरमध्ये निधन झाल्याने ही जागा रिक्त आहे. या जागेवर भाजप कर्डिले कुटुंबातीलच सदस्याला उमेदवारी देऊन भावनिक आवाहन करणार की एखाद्या नवीन चेहऱ्याला संधी देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – Rohit Pawar : 'काळ्या काचेच्या गाडीतून पाठवणी, पाहुणचार केला…'; विमान कंपनी मालकाला CID कडून VIP ट्रीटमेंट; रोहित पवारांचा आरोप

राजकीय प्रतिष्ठा पणाला
या दोन जागांच्या पोटनिवडणुकीमुळे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. बारामतीमध्ये पवार कुटुंबाचा वारसा पुढे नेला जात असताना, राहुरीमध्ये भाजप आपली जागा राखण्यासाठी कोणती खेळी खेळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number