SIR वरून वाद सुरू असतानाच निवडणूक आयोगात खळबळ, रातोरात घेतला मोठा निर्णय

Deputy Election Commissioner : देशात एसआयआर प्रक्रियेवरून राजकीय वातावरण तापलेलं असतानाच भारतीय निवडणूक आयोगात महत्त्वाचा प्रशासकीय फेरबदल करण्यात आला आहे. राजस्थान कॅडरचे आयएएस अधिकारी प्रकाश राजपुरोहित यांची उपनिवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून, या घडामोडींकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
निवडणूक आयोगात मोठा फेरबदल
Deputy Election Commissioner

देशभरात सध्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण SIR प्रक्रियेवरुन राजकीय वातावरण तापलेले असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगात महत्त्वाचा प्रशासकीय फेरबदल करण्यात आलेला आहे. केंद्र सरकारने 2010 च्या बॅचचे असलेले IAS अधिकारी प्रकाश राजपुरोहित यांची आता उप निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली गेली आहे.

निवडणूक आयोगात मोठा फेरबदल
मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने या नियुक्तीला आता मंजुरी दिली असून कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाताने याबद्दल अधिकृत आदेश ही जारी केला आहे. याच आदेशानुसार राजस्थान केडरचे अधिकारी असलेले प्रकाश राजपुरोहित हे एप्रिल 2030 पर्यंत या पदावर राहणार आहेत. तर याआधी ते मे 2026 पासून संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन या विभागात सहसचिव म्हणून कार्यरत होते.

हेही वाचा-CPM खासदाराला दिल्ली पोलिसांकडून मारहाण?; जखमी अवस्थेत रस्त्यावर सोडल्याचा आरोप, व्हिडीओ व्हायरल

केंद्राने नुकत्याच केलेल्या 27 सहसचिव या दर्चाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचाच हा एक भाग आहे, असे सांगण्यात येत आहे. विशेष हे पद गेल्या ऑगस्ट महिन्यापासून रिक्त होते. जर पाहिलं तर याआधी या पदावर असलेले संजय कुमार हे मतदार यादी आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रभारी होते. त्यांना मुदतीपूर्वीच मूळ संवर्गात पाठविले गेले होते. विशेष म्हणजे 24 जून 2025 रोजी SIR प्रक्रिया देशभरात लागू करण्याच्या महत्त्वाच्या आदेशावर संजय कुमार यांचीच स्वाक्षरी होती.

एका सहीने बदललं सारं गणित
आयोगाच्या आयटी विभागाच्या कामकाजावरुन अंतर्गत मतभेद झाल्याची चर्चा झाली होती. ज्यात निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी या विभागाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतलेला होता. मात्र त्यानंतर जुलैमध्ये संजय कुमार यांच्याकडून आयटी विभागाचा कार्यभार हा काढून घेण्यात आला होता. पण दरम्यान SIR प्रक्रियेवरुन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यार विरोधकांनी आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version