माजी CBI अधिकारी थेट मोदींच्या विरोधात मैदानात! देशाच्या राजकारणात नव्या राजकीय पक्षाची एन्ट्री

वाराणसी येथे पार पडलेल्या या पक्ष घोषणा सोहळ्याप्रसंगी पक्षाचे अनेक महत्त्वाचे राष्ट्रीय व प्रादेशिक पदाधिकारी उपस्थित होते.

माजी CBI अधिकारी थेट मोदींच्या विरोधात मैदानात! देशाच्या राजकारणात नव्या राजकीय पक्षाची एन्ट्री
modi

Former CBI Chief M Nageshwar Rao Enters Politics: सीबीआयचे माजी संचालक एम. नागेश्वर राव यांनी थेट राजकारणात पाऊल ठेवले असून, त्यांनी एका नव्या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी या संसदीय मतदारसंघातून त्यांनी ‘सार्वजनिक सनातन पार्टी’ (SSP) या नव्या पक्षाची घोषणा केली आहे. प्रशासकीय सेवेतील चार दशकांच्या प्रदीर्घ अनुभवानंतर देशाचा विकास साधण्यासाठी केवळ प्रशासकीय सुधारणाच नव्हे, तर इतर क्षेत्रातही बदलांची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

पक्षाची विचारधारा आणि मुख्य चार स्तंभ
एम. नागेश्वर राव यांनी स्पष्ट केले की, त्यांची ही सनातन संकल्पना केवळ विशिष्ट उपासना पद्धतीपुरती मर्यादित नसून ती सत्य, धर्म, कर्तव्य, करुणा आणि न्याय यावर आधारलेली जीवनशैली आहे. नवीन पक्षाची ही भूमिका प्रामुख्याने खालील चार महत्त्वाच्या स्तंभांवर उभी राहणार आहे. शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या क्षेत्रांना सर्वोच्च प्राधान्य देत देशातील प्रत्येक नागरिकासाठी दर्जेदार सुविधा निर्माण करणे. देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाला आधुनिक तंत्रज्ञान आणि आर्थिक विकासाशी जोडत पुढे जाणे. मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे ही केवळ पूजेची ठिकाणे न राहता भारतीय संस्कृतीची जिवंत केंद्रे म्हणून त्यांचे जतन करणे. समाजातील प्रत्येक घटकाला सामावून घेत आधुनिक भारत घडवण्याच्या दिशेने पावले उचलणे.

हेही वाचा – देशाच्या राजकारणात मोठा भूकंप! ‘या’ राज्यातील मुख्यमंत्र्यांचा पक्ष थेट ‘INDIA’ आघाडीत दाखल

कोणत्याही जाती किंवा समुदायाच्या विरोधात नाही पक्ष
नवा पक्ष स्थापन करताना राव यांनी आवर्जून सांगितले की, त्यांची विचारधारा किंवा सनातन संकल्पना ही कोणाच्याही विरोधात नाही. समाजात कोणतीही फूट पाडण्याऐवजी सर्व जाती आणि समुदायांना सोबत घेऊन सर्वांसाठी एकत्रित काम करण्याचा पक्षाचा मुख्य उद्देश आहे. आधुनिकता आणि संस्कृती यांच्यात योग्य संतुलन साधत एक मजबूत राष्ट्र निर्माण करण्याचे ध्येय त्यांनी समोर ठेवले आहे.

पक्षप्रवेश आणि उपस्थित प्रमुख पदाधिकारी
वाराणसी येथे पार पडलेल्या या पक्ष घोषणा सोहळ्याप्रसंगी पक्षाचे अनेक महत्त्वाचे राष्ट्रीय व प्रादेशिक पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये राष्ट्रीय उपाध्यक्ष महंत तीर्थानंद, उपाध्यक्ष रितू राठोड, महासचिव राजा सक्षम सिंह योगी, प्रवक्त्या बबिता शर्मा, उत्तर प्रदेशचे प्रभारी राकेश तिवारी आणि संघटन मंत्री नारायण सिंह यांच्यासह अनेक मान्यवर सामील झाले होते.

हेही वाचा – 10 ऑक्टोबरला दिल्लीला येऊन धडकणार; मुंबईतील आंदोलनानंतर CJP चा जंतरमंतरवर आंदोलनाचा इशारा

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number