Vishakha Raut : विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द, नगरविकास विभागाकडून अधिसूचना जारी; सहा वर्षे निवडणूक लढविण्यासही बंदी

मुंबई : मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आल्यामुळे त्यांना पुढील सहा वर्षे नगरसेवक म्हणून निवडणूक लढवता येणार नाही. तसेच त्यांचे नगरसेवकपदही रद्द करण्यात आले आहे. याबाबतची अधिसूचना राज्य सरकारने शुक्रवारी जारी केली. महापालिकेतील एक अनुभवी नगरसेविका, माजी महापौर विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र पालघर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने […]

Vishakha Raut : विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द, नगरविकास विभागाकडून अधिसूचना जारी; सहा वर्षे निवडणूक लढविण्यासही बंदी

मुंबई : मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आल्यामुळे त्यांना पुढील सहा वर्षे नगरसेवक म्हणून निवडणूक लढवता येणार नाही. तसेच त्यांचे नगरसेवकपदही रद्द करण्यात आले आहे. याबाबतची अधिसूचना राज्य सरकारने शुक्रवारी जारी केली. महापालिकेतील एक अनुभवी नगरसेविका, माजी महापौर विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र पालघर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवले होते. समितीच्या निर्णयाच्या आधारे मुंबई महापालिका आयुक्तांनी राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करून राऊत यांच्याविरुद्ध अपात्रतेची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली. या पत्रव्यवहाराविरोधात राऊत यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र न्यायालयाने राऊत यांना दिलासा दिलेला नाही. त्यामुळे येत्या सोमवार, 7 सप्टेंबर रोजी राऊत यांचे नगरसेवक पद रद्द झाल्याची घोषणा सभागृहात होण्याची शक्यता होती. मात्र त्याआधी राज्याच्या नगरविकास विभागाने याबाबतची अधिसूचना जारी केली.

हेही वाचा : MNS’s Gen-Z Dahi Handi : आधी होकार, आता नकार! दहीहंडीच्या एक दिवस आधी पोलिसांनी अचानक नाकारली परवानगी; मनसे जेन-झी हंडी फुटणार?

विशाखा राऊत या दादरच्या प्रभाग क्रमांक 191 मधून निवडून आल्या होत्या.  सिद्धिविनायक मंदिर, शिवाजी पार्क, दादर पश्चिम हा भाग त्यांच्या प्रभागात येतो. मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888 मधील कलम 16 नुसार त्या नगरसेवकपदासाठी अपात्र ठरल्या असून त्यांची जागा रिक्त झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number