Rohit Pawar: ‘सुदैवाने मोठा अनर्थ टळला…’; भुजबळांच्या हेलिकॉप्टर लँडिंगवरून रोहित पवारांचा सरकारवर निशाणा

आज सुदैवाने छगन भुजबळ साहेबांचा अपघात टळला, पण शासनाने इतका हलगर्जीपणा करणे योग्य नाही, असे म्हणत त्यांनी या प्रकरणाच्या गांभीर्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.<br/>

Rohit Pawar: ‘सुदैवाने मोठा अनर्थ टळला…’; भुजबळांच्या हेलिकॉप्टर लँडिंगवरून रोहित पवारांचा सरकारवर निशाणा

Rohit Pawar: पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे मंत्री छगन भुजबळ यांचे हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी कार पार्किंगमध्ये उतरल्याच्या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवाट गट)  आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात ट्विट करत राज्य सरकारवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवला आहे. “आज सुदैवाने छगन भुजबळ साहेबांचा अपघात टळला, पण शासनाने इतका हलगर्जीपणा करणे योग्य नाही,” असे म्हणत त्यांनी या प्रकरणाच्या गांभीर्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

हेलिकॉप्टरमधील त्रुटी आणि देखभालीचा प्रश्न
रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये महत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासाच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली आहे. छगन भुजबळ यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचे हेलिकॉप्टर अचानक पार्किंगमध्ये उतरवणे ही बाब अतिशय गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले. अनेक विमाने आणि हेलिकॉप्टर्समध्ये देखभाल-दुरुस्तीसह इतरही तांत्रिक त्रुटी असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. अशा परिस्थितीत महत्त्वाच्या व्यक्तींनी प्रवास करताना अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

हेही वाचा – Sharad Pawar: शरद पवारांच्या ‘त्या’ विधानाने वारकरी संप्रदाय आक्रमक! ‘धर्मांध शक्ती’ आणि ‘ 60 टक्के’ मांडणीच्या दाव्याने नवा राजकीय वाद पेटला

सरकारने खबरदारी घेण्याची रोहित पवारांची अपेक्षा
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रोहित पवार यांनी सरकारला धारेवर धरले आहे. त्यांनी म्हटले की, केवळ नशिबाने आज मोठा अनर्थ टळला आहे, परंतु अशा चुका पुन्हा होऊ नयेत यासाठी सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत. विमान किंवा हेलिकॉप्टरने प्रवास करताना सरकार यापुढे अधिक काळजी घेईल आणि सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे नेत्यांच्या हवाई प्रवासातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number