7 मे रोजी होणार शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी

शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले होते. सध्या या प्रकरणाबाबतची पुढील सुनावणी 7 मे रोजी होणार आहे.

7 मे रोजी होणार शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी

मुंबई: शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले होते. मात्र, या निर्णयाच्या विरोधात माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात गेले होते. या प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी फेब्रुवारी 2023 मध्ये याचिका दाखल केली होती. सध्या या प्रकरणाबाबतची पुढील सुनावणी 7 मे रोजी होणार आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष कोणाचा आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचा असेल याचा निर्णय घेतला जाईल.

मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे:

शिवसेनेत फूट पडल्यानंतर, भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. यादरम्यान, निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना वेगवेगळे चिन्ह दिले होते. मात्र, पुढे निर्णय देताना निवडणूक आयोगाने शिवसेना मूळ पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना देण्याचा निर्णय घेतला होता.

हेही वाचा: संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट

शिंदेंच्या बाजूने नार्वेकरांचा फैसला:

तत्कालीन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला होता. त्यांच्या या निर्णयामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांना अपात्र ठरवण्यात आले नाही. त्यासोबतच, शिवसेना पक्ष विधिमंडळातील शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंकडे राहिला होता आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती पुन्हा सत्तेत आली. यादरम्यान, शिंदेंचे उमेदवार धनुष्यबाण चिन्हावर लढले होते.

निर्णय कोणाच्या बाजूने?

7 मे रोजी होणाऱ्या सुनावणीमध्ये शिवसेना हा मूळ पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष असेल. न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायाधीश कोटेश्वर सिंह यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. ही सुनावणी तब्बल दीड वर्षानंतर होत असल्यामुळे पुढची तारीख मिळणार की अंतिम फैसला होणार याबाबत उत्सुकता आहे.

निवडणुकीत फैसला झाला:

जरी न्यायालयात चिन्ह आणि पक्षाबद्दलची सुनावणी होत असली तरी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एका कार्यक्रमात म्हटले की, 'खरी शिवसेना कोणाची याचा फैसला निवडणुकीत झाला आहे. घरातून काम करणाऱ्यांना जनतेने घरीच बसवले आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने पक्ष चालवत आहोत'.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number