Uddhav Kamble : ‘मी AB फॉर्म खाल्ला…, भावनेच्या भरात तो…’; शिंदेंच्या त्या उमेदवारानं सांगितलं नेमकं काय घडलं?

याप्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून आता पोलिसात गुन्हा दाखल झाला असून राजकीय वर्तुळात या 'राड्याची' जोरदार चर्चा सुरू आहे.<br/>

Uddhav Kamble : ‘मी AB फॉर्म खाल्ला…, भावनेच्या भरात तो…’; शिंदेंच्या त्या उमेदवारानं सांगितलं नेमकं काय घडलं?

Uddhav Kamble AB Form Controversy : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी मोठं राजकीय नाट्य पाहायला मिळालं. प्रभाग क्रमांक 36 मध्ये शिवसेना (शिंदे गट) अंतर्गत निर्माण झालेल्या वादातून एका उमेदवाराने चक्क दुसऱ्याचा ‘एबी’ फॉर्म फाडून टाकला. याप्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून आता पोलिसात गुन्हा दाखल झाला असून राजकीय वर्तुळात या ‘राड्याची’ जोरदार चर्चा सुरू आहे.

नेमकी घटना काय?

प्रभाग क्रमांक 36 (सहकारनगर-पद्मावती) मध्ये शिंदे गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी चढाओढ सुरू होती. पक्षाने या जागेसाठी उद्धव कांबळे आणि मच्छिंद्र ढवळे अशा दोन उमेदवारांना ‘एबी’ फॉर्म दिल्याने संभ्रम निर्माण झाला. छाननी प्रक्रियेदरम्यान, मच्छिंद्र ढवळे यांचा अर्ज आपल्याआधी सादर झाला असून तो वैध ठरेल, हे लक्षात येताच संतापलेल्या उद्धव कांबळे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या समोरच ढवळे यांचा फॉर्म हिसकावून तो फाडून टाकला.

हेही वाचा – MNS vs Thackeray Sena : ठाकरे बंधूंच्या युतीत मिठाचा खडा; मुंबईतील ‘या’ वॉर्डात मनसे आणि ठाकरे गट आमनेसामने

‘फॉर्म गिळला’ की फक्त ‘फाडला’?

सुरुवातीला उद्धव कांबळे यांनी फॉर्म फाडून गिळून टाकल्याची (खाल्ल्याची) चर्चा सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली होती. मात्र, पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर उद्धव कांबळे यांनी स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन आपली बाजू मांडली. ‘मी भावनेच्या भरात फॉर्म फाडला हे मान्य आहे, पण मी तो खाल्ला नाही,’ असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही आपली मोठी चूक असल्याचे कबूल केले.

हेही वाचा – PMC Election : पुण्यात गँगवॉरचा भडका आता निवडणूक मैदानात; आंदेकर आणि कोमकर कुटुंब समोरासमोर

उद्धव कांबळे यांनी या कृतीमागे आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलं की, ‘माध्यमांमध्ये ज्या बातम्या आल्या आहेत की, मी फॉर्म गिळला, खाल्ला, वगैरे. पण तसं काही झालेलं नाही. मी फॉर्म खाल्ला नाही. मी जेव्हा फॉर्म भरला. त्यानंतर मला समजलं की, तिथे अर्जाची छाननी सुरू आहे आणि तिथे मच्छिंद्र ढवळे यांनी आमच्या पक्षाकडून फॉर्म भरल्याचं समजलं. त्यांना मी व्यक्तीश: ढवळेंना ओळखत नाही. त्यांचा पक्षाशी कोणताही काही संबंधही नाही, त्यांनी कुठून तरी एबी फॉर्म मिळवला आणि तिकडे सबमीट केला आहे. परंतु मी वरिष्ठांना विचारलं, तेव्हा त्यांनी मीच अधिकृत उमेदवार असल्याचं मला सांगितलं. तसं पत्रही त्यांनी निवडणूक आयोगाला दिलं. जेव्हा मला प्रकार समजला तेव्हा मी कार्यालयात पोहोचलो. भावनेच्या भरात तो माझ्याकडून फाटला गेला आहे,’ असं कांबळे यांनी नमूद केलं आहे. तथापी, त्यांनी पुढे बोलताना म्हटलं की, ‘मी माझी चुक मान्य करतो. मला माहिती आहे की, माझी चुकी झाली आहे. पण प्रभाग क्रमांक 36 मध्ये मी अनेक वर्षांपासून काम करतोय. ढवळे यांना मी किंवा शिवसेनेचे कोणतेच पदाधिकारी ओळखत नाहीत. त्यांनी तो फॉर्म कुठून मिळवला, हेही आम्हाला माहीत नाही, असंही उद्धव कांबळे यांनी म्हटलं आहे. 

प्रशासकीय कारवाई

निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणल्याप्रकरणी आणि सरकारी दस्तऐवजाची नासधूस केल्याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत एकनाथ शिंदे यांनीही कांबळे यांना कडक शब्दांत खडसावल्याचही वृत्त आहे.  
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number