Abhijeet Dipke : ‘मी माझी शैक्षणिक कागदपत्रे दाखवतो, तुम्ही पण तुमच्या पदव्या दाखवा’, अभिजीत दीपकेंचं भाजप नेत्यांना आव्हान; व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

एका भाजप कार्यकर्त्याने त्यांच्या शिक्षणाबाबत माहिती मागवण्यासाठी भाजप नेत्याने 'आरटीआय' अंतर्गत अर्ज दाखल केल्याचा दावा दीपके यांनी केला आहे.

Abhijeet Dipke : ‘मी माझी शैक्षणिक कागदपत्रे दाखवतो, तुम्ही पण तुमच्या पदव्या दाखवा’, अभिजीत दीपकेंचं भाजप नेत्यांना आव्हान; व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

Abhijeet Dipke :  माहिती अधिकाराचा (RTI) वापर करून राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीची चौकशी करण्याचे सत्र सुरू असतानाच, आता या वादात अभिजीत दीपके यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. एका भाजप कार्यकर्त्याने त्यांच्या शिक्षणाबाबत माहिती मागवण्यासाठी भाजप नेत्याने ‘आरटीआय’ अंतर्गत अर्ज दाखल केल्याचा दावा दीपके यांनी केला आहे. या संदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (ट्विटर) वर एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी भाजपवर थेट निशाणा साधला आहे.

हेही वाचा – BMC News : महापालिकेत भ्रष्टाचाराचे आरोप असलेले 112 अधिकारी सेवेत कायम, अनेकजण चौकशी पूर्ण होण्याआधीच निवृत्त; RTI मधून उघड

कागदपत्रे दाखवण्यास तयार; तुमचे नेते पदव्या दाखवणार का?
आपल्या व्हिडिओमध्ये अभिजीत दीपके यांनी भाजप नेत्यांना थेट आव्हान दिले आहे. “मला नुकतेच समजले की एका भाजप कार्यकर्त्याने माझ्या शिक्षणाची माहिती मिळवण्यासाठी आरटीआय केला आहे. मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे. तुमचे नेते त्यांच्या पदव्या जाहीर करतील का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, आपण मिळवलेली शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्जाशी संबंधित सर्व अधिकृत कागदपत्रे सादर करण्यास आपण पूर्णपणे तयार आहोत. परंतु, भाजपचे वरिष्ठ नेते त्यांच्या अधिकृत पदव्या जाहीर करण्याचे धाडस दाखवतील का, असा टोलाही त्यांनी लगावला.

‘सामान्य तरुणाच्या शिक्षणाचा त्रास का?’
सामान्य पार्श्वभूमीतून आलेल्या तरुणांच्या उच्च शिक्षणाबाबत सत्ताधारी पक्षाला नेमकी काय अडचण आहे, असा प्रश्नही दीपके यांनी उपस्थित केला. “या लोकांना शिक्षणाबाबत एवढी अडचण का आहे, हेच मला समजत नाही. एखाद्या सामान्य कुटुंबातील तरुणाने विद्यापीठात जाऊन शिक्षण घेणे यांना का खटकते?” असा संताप त्यांनी व्यक्त केला. अभिजित दीपके यांच्या या व्हिडिओनंतर आता भाजप काय उत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number