Imtiaz Jaleel Attack: संभाजीनगर हादरलं! इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला; MIM च्या दोन गटांत तुंबळ हाणामारी

एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांची पदयात्रा बायजीपुरा भागातून जात असताना, पक्षातीलच नाराज गट आणि समर्थक आमनेसामने आले. यावेळी झालेल्या जोरदार राड्यात आंदोलकांनी जलील यांच्या वाहनावर हल्ला केला.

Imtiaz Jaleel Attack: संभाजीनगर हादरलं! इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला; MIM च्या दोन गटांत तुंबळ हाणामारी

Imtiaz Jaleel Attack: महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा झाला. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांची पदयात्रा बायजीपुरा भागातून जात असताना, पक्षातीलच नाराज गट आणि समर्थक आमनेसामने आले. यावेळी झालेल्या जोरदार राड्यात आंदोलकांनी जलील यांच्या वाहनावर हल्ला केला आणि त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा – Ganesh Naik Speech: ‘चोरांची नजर नेहमी खाली असते…’; गणेश नाईक यांची एकनाथ शिंदेंवर खोचक शब्दांत टीका

नेमकी घटना काय?

इम्तियाज जलील हे त्यांच्या ‘थार’ गाडीच्या पुढच्या सीटवर बसून प्रचार करत असताना अचानक आंदोलकांनी त्यांना घेराव घातला. यावेळी त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर संतप्त जमावाने गाडीवर हल्ला केला. या हल्ल्यात जलील थोडक्यात बचावले असले, तरी त्यांच्या गाडीतील एका कार्यकर्त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना अखेर सौम्य लाठीमार करावा लागला.

हेही वाचा – Devendra Fadnavis: “काँग्रेस-MIM सोबतची युती तोडा, नाहीतर…” फडणवीसांचा भाजप नेत्यांना थेट इशारा करत दिले कडक कारवाईचे संकेत

तिकिट कापल्याचा राग आणि काँग्रेसवर आरोप

या हिंसक वळणामागे उमेदवारी वाटपाचा वाद असल्याचे समोर येत आहे. एमआयएमने यावेळी तब्बल 22 माजी नगरसेवकांचा पत्ता कापून नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. यामुळे जुन्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष होता, ज्याचे रूपांतर आजच्या हल्ल्यात झाले. जलील समर्थकांनी या हल्ल्यामागे काँग्रेस उमेदवार करीम कुरेशी यांचा हात असल्याचा थेट आरोप केला आहे. दुसरीकडे, एमआयएम कार्यकर्त्यांनी आमच्या भागात येऊन अरेरावीची भाषा वापरली, त्यामुळे हा प्रकार घडला, असा दावा करीम कुरेशी यांनी केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number