Nanded Bank Election : मुख्यमंत्र्यांचा नांदेडच्या खासदारांना एक फोन अन् भाजप आमदाराच्या गळ्यात पडली जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ; नेमकं काय घडलं?

नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनल दणदणीत विजय मिळवत 23 जागे पैकी सर्वाधिक जागा जिंकल्या. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात शेतकरी विकास पॅनल निवडणूक लढवली. संचालकांपैकी 11 संचालक हे सुरुवातीला बिनविरोध करण्यात आले. 12 जागेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. शेतकरी विकास पॅनलने सर्वाधिक जागा जिंकल्या. बँकेच्या […]

Nanded Bank Election : मुख्यमंत्र्यांचा नांदेडच्या खासदारांना एक फोन अन् भाजप आमदाराच्या गळ्यात पडली जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ; नेमकं काय घडलं?

नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनल दणदणीत विजय मिळवत 23 जागे पैकी सर्वाधिक जागा जिंकल्या. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात शेतकरी विकास पॅनल निवडणूक लढवली. संचालकांपैकी 11 संचालक हे सुरुवातीला बिनविरोध करण्यात आले. 12 जागेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. शेतकरी विकास पॅनलने सर्वाधिक जागा जिंकल्या. बँकेच्या अध्यक्षपदासाठी आणि उपाध्यक्ष पदासाठी चुरस निर्माण झाली होती. अनेक दिग्गज नेत्यांची नावे समोर आल्यानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक फोन माजी मुख्यमंत्री, खासदार अशोक चव्हाण यांना केला. आमदार तुषार राठोड यांना बँकेचे अध्यक्ष पद द्यावे, अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांना केल्या. फडणवीस यांच्या सूचनेनुसार बँकेच्या अध्यक्षपदाची माळ मुखेड विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार तुषार राठोड यांच्या गळ्यात टाकण्यात आली तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या नेत्या मीनल खतगावकर यांची निवड करण्यात आली. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली.

हेही वाचा : Dattatray Bharne : धक्कादायक! कर्जमाफी योजनेतून 94 हजार शेतकऱ्यांना वगळले, तर 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांना कर्जाचं वितरण; कृषीमंत्र्यांची माहिती

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number