Rahul Gandhi Instagram Post: …अन् अवघ्या काही वेळातच इन्स्टाग्रामकडून राहुल गांधी आणि ‘थलपती’ विजय यांची ‘ती’ पोस्ट ब्लॉक; काँग्रेसकडून मोठा दावा

राहुल गांधींनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्यासोबत शेअर केलेला हा व्हिडिओ इन्स्टाग्रामने अवघ्या काही वेळातच ‘ब्लॉक’ केल्याचा दावा काँग्रेसने केला. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.

Rahul Gandhi Instagram Post: …अन् अवघ्या काही वेळातच इन्स्टाग्रामकडून राहुल गांधी आणि ‘थलपती’ विजय यांची ‘ती’ पोस्ट ब्लॉक; काँग्रेसकडून मोठा दावा

10 मे रोजी तामिळनाडूच्या राजकारणात एका नव्या पर्वाचा श्रीगणेश झाला आहे. दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार आणि आता राज्याचे मुख्यमंत्री बनलेले सी. जोसेफ विजय यांनी आपल्या मंत्रिमंडळाची घोषणा केली. प्रसिद्ध अभिनेते विजय यांच्या शपथविधी सोहळ्याला राहुल गांधी यांनी हजेरी लावली होती. तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर टीव्हीके प्रमुख सी. जोसेफ विजय यांचा स्टेडियममधील सेल्फी व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला. शपथविधीनंतर विजय यांनी राहुल गांधी आणि उपस्थित समर्थकांसोबत खास क्षण मोबाईलमध्ये कैद केला.

हेही वाचा- India-Nepal Relations: नेपाळमध्ये ‘बालेन पर्व’ सुरू होताच भारत-नेपाळ मैत्रीत मिठाचा खडा; 45 दिवसांत भारताविरोधी घेतले ‘हे’ मोठे निर्णय

मात्र राहुल गांधी यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्यासोबत शेअर केलेला हा व्हिडिओ इन्स्टाग्रामने अवघ्या काही वेळातच ‘ब्लॉक’ केल्याचा दावा काँग्रेसने केला. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यावेळी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (MeitY) नियमांचे उल्लंघन झाल्याचा दावा करत ही कारवाई केल्याचे काँग्रेस नेते श्रीवत्सा यांनी म्हटले आहे.

तर ही समस्या प्लॅटफॉर्मच्या तांत्रिक चुकीमुळे झाल्याचे प्रत्युत्तर देत केंद्र सरकारने हे आरोप फेटाळून लावले. इन्स्टाग्रामच्या अंतर्गत यंत्रणेने चुकीच्या पद्धतीने ही पोस्ट फ्लॅग केली होती, ज्यामुळे ती तात्पुरती ब्लॉक केली, मात्र तांत्रिक चूक असल्याचे मान्य करत इन्स्टाग्रामने राहुल गांधी यांची पोस्ट पुन्हा रिस्टोअर केली. अवघ्या तासाभरात राहूल गांधी यांनी शेअर केलेल्या या पोस्टला 12 दशलक्ष व्ह्यूज मिळाले होते.

हेही वाचा- Middle East Crisis: मोदींच्या आवाहनानंतर केंद्राने बोलावली तातडीची प्रेस कॉन्फरन्स; पेट्रोल, डिझेल आणि LPG बद्दल दिली मोठी माहिती

यावेळी काँग्रेस नेते आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय श्रीवत्सा यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, “इंस्टाग्रामने विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची, आजच्या शपथविधी सोहळ्यातील थलपथी विजय यांच्यासोबतची रील आणि फोटो पोस्ट ब्लॉक केली आहे. व्हायरल झालेल्या रीलला एका तासापेक्षा कमी वेळात १२ दशलक्ष व्ह्यूज मिळाले होते आणि व्हायरल झालेली फोटो पोस्ट आधीच ४६ दशलक्ष लोकांपर्यंत पोहोचली होती.

त्यांचे खाते का अनुपलब्ध झाले आहे याचे कोणतेही कारण मेटाने दिलेले नाही. हा ‘तांत्रिक बिघाड’ MEITY च्या नियमांमुळे झाला आहे! राहुल गांधींची सोशल मीडिया खाती बऱ्याच काळापासून दाबून ठेवण्यात आली आहेत. त्यांची एक्स रीच, यूट्यूब व्ह्यूज, इन्स्टा फॉलोअर्स हे सर्व दाबून ठेवण्यात आले आहे. अशा प्रकारे भारताच्या विरोधी पक्षनेत्यांचा आवाज दाबला जातो.”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number