मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पाऊस सुरू आहे. अशातच, पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने दृश्य पाहायला मिळत आहे. यावर, शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल करत म्हणाले की, 'सरकारच्या उदासीनतेमुळे मुंबई ठप्प झाली आहे'. मुंबईमध्ये पाणी तुंबल्यामुळे आदित्य ठाकरे आक्रमक झाले आहेत. पहिल्याच पावसामध्ये मुंबईची तुंबी झाल्यामुळे आदित्य ठाकरे संतापले आहेत. यावर, मंत्री नितेश राणेंनी आदित्य ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तसेच, मंत्री नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना टोला देखील लगावला आहे. चला तर सविस्तर जाणून घेऊया.
काय म्हणाले मंत्री नितेश राणे?
'डिनो मोरियाच्या घरी आदित्य ठाकरे मंत्री असताना जास्तीत जास्त वेळ थांबायचे. म्हणून डिनो मोरियाची चौकशी होणं म्हणजे आदित्य ठाकरेचं पितळं उघड होण्यासारखं आहे. आज मुंबईमध्ये जे काही पाण्याची परिस्थिती आहे, त्याचे सगळे जबाबदार हे आदित्य ठाकरे आहेत', असे मंत्री नितेश राणे म्हणाले.
हेही वाचा: आंतरजातीय विवाह केल्याने नर्स सासूने घरीच केला सुनेचा गर्भपात
डिनो मोरिया हा मातोश्रीचा सून:
तसेच, पुढे मंत्री नितेश राणे म्हणाले की, 'डिनो मोरिया हा मातोश्रीचा सून आहे, डिनो मोरिया आदित्य ठाकरेंचा बेटर हाफ आहे. आदित्य ठाकरे मंत्री असताना डिनो मोरिया वारंवार घरी जायचे, मुंबईतील सर्व गोष्टीला जबाबदार आदित्य ठाकरेंच्या नाईट लाईफचे मित्र आहेत. डिनो मोरिया ही मातोश्रीची सून आहे, त्यांचे मातोश्रीशी थेट संबंध आहेत. अडीच वर्षांपूर्वी कोणाचं सरकार होतं? आदित्य ठाकरे यांनी माझ्यासोबत खुल्या व्यासपीठावर येऊन चर्चा करावी, डिनो मोरियासोबत अय्याशी केली नसती तर मुंबई बुडाली नसती, यांनीच नाईट लाईफ गँगला कंत्राटं दिली, त्यामुळे ही अवस्था झाली'.