Saturday, July 12, 2025 12:11:38 AM

विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका जाहीर; ठाकरे बंधूंचं नागरिकांना निमंत्रण

सरकारने हिंदी सक्तीविरोधातील जीआर रद्द केल्यामुळे ठाकरे बंधू 5 जुलैला विजयी मेळावा घेणार आहेत. या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका जाहीर झाली आहे. सेनाभवन परिसरात निमंत्रण पत्रिका झळकली आहे.

विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका जाहीर ठाकरे बंधूंचं नागरिकांना निमंत्रण

मुंबई: सरकारने हिंदी सक्तीविरोधातील जीआर रद्द केल्यामुळे ठाकरे बंधू 5 जुलैला विजयी मेळावा घेणार आहेत. या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका जाहीर झाली आहे. सेनाभवन परिसरात निमंत्रण पत्रिका झळकली आहे. 

5 जुलैला होणाऱ्या विजयी मेळावा होणार आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पत्रिकेतून नागरिकांना निमंत्रण दिले आहे. आवाज मराठीचा वाजत गाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या !! आम्ही वाट पाहतोय...! अशा आशयाची निमंत्रण पत्रिका ठाकरे बंधूकडून झळकवण्यात आली आहे. दादर सेनाभवन परिसरात ही निमंत्रण पत्रिका झळकल्याचे दिसून आले. 

हेही वाचा : आषाढी एकादशीला रंगणार ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ रिअॅलिटी शोचा अंतिम सोहळा

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची जोरदार तयारी सुरु आहे. ठाकरे बंधू ,शरद पवार, हर्षवर्धन सकपाळ व्यासपीठावर असणार आहेत. हॉलच्या बाहेर आणि रस्त्यावर एलईडी स्क्रीन लावणार आहेत. 7 ते 8 हजार लोकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मोठ्या बसेससाठी महालक्ष्मी रेस कोर्समध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. 
ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याचं जबरदस्त नियोजन करण्यात येत आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, हर्षवर्धन सकपाळ हे एकाच व्यासपीठावर असणार आहेत. वरळी डोम सभागृहात तसेच हॉलच्या बाहेर आणि रस्त्यावर एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहे. 7 ते 8 हजार लोकांना बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. वरळी डोम सभागृहाच्या बेसमेंटमध्ये 800 गाड्यांचा पार्किंगची व्यवस्था केली जात आहे. मोठ्या बसेससाठी महालक्ष्मी रेस कोर्समध्ये व्यवस्था करण्यात येणार आहे. 5 जुलै रोजी होणाऱ्या मेळाव्यासाठी चकोरची आवाज प्रणाली वापरण्याची शक्यता आहे. 


सम्बन्धित सामग्री