Sunday, February 09, 2025 04:32:36 PM

Manoj Jarange
गृहमंत्री जागे आहात का?; जरांगेंचा सरकारवर हल्लाबोल

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

गृहमंत्री जागे आहात का जरांगेंचा सरकारवर हल्लाबोल

धाराशिव : मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज धाराशिव येथे जनआक्रोश मोर्चा झाला. या मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राज्यात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे. बीड, परभणी, संभाजीनगर, जालना आणि आज धाराशिवमध्ये या जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. देशमुख आणि सुर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यावेळी देशमुख हत्येप्रकरणातील एकही आरोपी सुटला नाही पाहिजे. खंडणीच्या आरोपींवरही लावा अस म्हणत जरांगेंनी वाल्मिक कराडवर मकोका लावण्याची मागणी केली. जर वाल्मिक कराडवर म्हणजेच खंडणीच्या आरोपींवर मकोक नसले तर आम्हाला हा मकोक मान्य नसल्याचे जरांगेंनी म्हटले. 


हेही वाचा : धाराशिव जनआक्रोश मोर्चातून धस यांचा गौप्यस्फोट
 

सर्व आरोपींवर 302चा गुन्हा दाखल करा असे जरांगेंनी म्हटल आहे. देशमुखांची हत्या आणि खंडणीतले आरोपी एकच असल्याचा आरोप जरांगेंनी केला आहे. मी कोणाच्याही धमक्यांना घाबरत नाही. आम्ही सूर्यवंशी कुटुंबाच्या पाठिशी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

गृहमंत्री जागे आहात का?


धाराशिवमध्ये एका पोलीस अधिकाऱ्यांच्या तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला. धाराशिवमध्ये आल्यावर ही घटना मला समजली. परंतु अजूनही आरोपींना अटक झालेली नाही. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस जागे आहेत की झोपलेत? अशा शब्दात त्यांनी सरकारला धारेवर धरले. 

मकोका कायदा म्हणजे काय?

मकोका म्हणजे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा 
मकोका गुन्ह्यात कमीत कमी 5 वर्षांची शिक्षा होऊ शकते
आरोपींना 5 लाखांचा दंड होऊ शकतो
जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा देखील होऊ शकते
आरोपींच्या मालमत्ता जप्त होऊ शकतात
मकोका गुन्ह्यात लवकर जामीन मिळत नाही 
जास्तीत जास्त शिक्षा गुन्ह्याच्या स्वरुपावरुन होते
संघटीत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मकोका महत्वाचा 
मकोका लागल्यानं पोलिसांना 180 दिवस मिळणार 
खंडणी, अपहरण, हप्ते वसुली, सुपारी देणं, तस्करीसारख्या गुन्ह्यांमध्ये मकोका
मकोका लावण्यासाठी 2 किंवा त्यापेक्षा जास्त आरोपींची टोळी असावी लागते
 


सम्बन्धित सामग्री