Saturday, February 08, 2025 07:02:58 PM

Chhagan Bhujbal
'जरांगेंना अंगावर घेतल्याचे बक्षीस मिळाले'

जरांगेंना अंगावर घेतल्याचे बक्षीस मिळाले असल्याचे म्हणत छगन भुजबळ यांनी पक्ष नेतृत्वावर संताप व्यक्त केला आहे.

जरांगेंना अंगावर घेतल्याचे बक्षीस मिळाले

मुंबई : राज्यात महायुतीचे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला झाले. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात नवीन चेेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नवीन आमदारांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजीचे सूर दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा आहेत.  हिवाळी अधिवेशन असताना ते सोडून भुजबळ येवल्यात आले आहेत. जरांगेंना अंगावर घेतल्याचे बक्षीस मिळाले असल्याचे म्हणत छगन भुजबळ यांनी पक्ष नेतृत्वावर संताप व्यक्त केला आहे. 


छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न दिल्याने कार्यकर्त्यांच्या राग आणि निराशा असल्याचे भुजबळ यांनी सांगितले आहे. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलल्याने त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली आहे. गेल्या 5-6 महिन्यात जे झालं ते कार्यकर्त्यांसमोर मांडलं. सगळ्यांच्या मनात राग असल्याचे भुजबळ यांनी सांगितले आहे. 

मंत्रीपद कुणी नाकारलं हे शोधावं लागेल 

छगन भुजबळ यांनी म्हटले, माझ्या मंत्रीपदासाठी फडणवीस आग्रही होते. त्यामुळे माझं मंत्रीपद कुणी नाकारलं हे शोधावं लागेल. लोकसभा मागितली होती. राज्यसभा नाही. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याची तयारी दर्शवली होती. पंतप्रधान मोदी, शाह यांचा दाखला देण्यात आला होता. त्यावेळी मला निवडणुकीची सूचना देण्यात आली होती. लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. समाजातील विविध स्तरांतून पाठिंबा मिळू लागला. खूप वेळ प्रतिक्षा करूनही मला उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही. असे भुजबळ यांनी म्हटले. 


महाराष्ट्रात गरज म्हणून मला विधानसभा लढवायला सांगितली. उमेदवारी देतानाही वाट पाहावी लागली असे भुजबळ यांनी म्हटले. दरम्यान भुजबळांच्या राजीनाम्याच्या चर्चा सुरू झाल्या. यावर बोलताना विधानसभेचा राजीनामा देणार नाही असे भुजबळ यांनी माध्यमांना सांगितले.  अजित पवारांसोबत कुठलीही चर्चा झालेली नाही असे देखील छगन भुजबळ यांनी सांगितले.  

   


सम्बन्धित सामग्री