जालना : मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या सामूहिक आमरण उपोषणाच्या पाचवा दिवशी जरांगे यांची प्रकृती खालावली. सरकार मराठा समाजाच्या मागण्या मान्य करेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा पवित्रा जरांगेनी घेतलाय, दरम्यान सरकारने तातडीने मागण्या मान्य कराव्यात या मागणीसाठी मराठा आंदोलकांनी दुपारनंतर रास्तारोको केला. यावेळी आंदोलकांनीही मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
सरकार मागण्या मान्य करत नसल्यानं आपल्याला आंदोलन करावं लागतंय. असं सांगत जरांगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीडचे दिवंगत सरपंच संतेष देशमुख यांच्या कुटुंबियांनी एका दिवसाचे उपोषण केलं. मनोज जरांगे यांची प्रकृती खालावत चालल्याने मराठा समाज आधिक आक्रमक होऊ लागला आहे. आता आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे तर या आंदोलनात कोणाचा जीव गेल्यास त्याला सरकार जबाबदार असेल अशा इशारा जरांगे यांनी दिला आहे.
हेही वाचा : सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी जात आहात तर सावधान...
जरांगेंच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. यामुळे त्यांची तब्येत खालावली आहे. मात्र मागण्या पूर्ण होईपर्यंत उपचार घेणार नसल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. तसेच आंदोलनात कोणाचाही जीव गेल्यास सरकार जबाबदार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाची दिशा बदलणार असल्याचा इशारा यावेळी जरांगेंनी दिला आहे.
हेही वाचा : निमगावकरांनी काढली वानराची अंत्ययात्रा; वाचून व्हाल आश्चर्यचकित
जालनातील अंतरवाली सराटीत मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला आहे. सुखानं खाऊ दिलं नाही तर 5 वर्षे राहून न देण्याचा इशारा जरांगेंनी सरकारला दिला आहे.