‘अजितदादांनी कायम साथ दिली, पण…’; सोमेश्वर निवडणुकीवरून जय पवारांची भावूक प्रतिक्रिया

कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी पक्षाची साथ सोडत स्वतंत्र पॅनेल उभारल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी अस्वस्थता पसरली आहे.

‘अजितदादांनी कायम साथ दिली, पण…’; सोमेश्वर निवडणुकीवरून जय पवारांची भावूक प्रतिक्रिया
‘या’ नेत्याच्या बंडखोरीवर जय पवारांनी व्यक्त केली खंत

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना मोठे वळण मिळाले आहे. कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी पक्षाची साथ सोडत स्वतंत्र पॅनेल उभारल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी अस्वस्थता पसरली आहे. यावर बोलताना राष्ट्रवादीचे नेते जय पवार यांनी तीव्र खंत व्यक्त केली. “दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जगताप यांना नेहमीच भक्कम पाठबळ दिले, त्यामुळे ते ऐन निवडणुकीत अशी अचानक विरोधी भूमिका घेतील अशी आम्हाला अजिबात अपेक्षा नव्हती,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शरद पवार यांच्या उपस्थितीत ‘सिल्व्हर ओक’वर चर्चा झाली होती, मात्र जागावाटपावरून बिनसल्याने ही बोलणी अपयशी ठरली.

भाजप नेत्याच्या साथीने जगतापांचे स्वतंत्र पॅनेल

पुरुषोत्तम जगताप यांनी या निवडणुकीत भाजप नेते संजय जगताप यांच्याशी हातमिळवणी करत स्वतंत्र पॅनेल तयार केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षासमोर मोठे राजकीय आव्हान उभे ठाकले आहे. यावर बोलताना जय पवार यांनी स्पष्ट केले की, पार्थ पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि वरिष्ठ नेत्यांनी विचारविनिमय करून नवीन आणि जुन्या 12 ते 15 अनुभवी कार्यकर्त्यांचा समतोल साधत अधिकृत पॅनेलची रचना केली होती. शेतकऱ्यांना भविष्यात उसाला योग्य भाव मिळावा आणि कारखान्याचा विकास व्हावा हाच या पॅनेलचा मुख्य हेतू होता.

हेही वाचा – सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट! शेवटच्या क्षणापर्यंत समीकरणं बदलली; राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र

जगतापांवर कोणतीही कारवाई नाही

पुरुषोत्तम जगताप यांच्यावर पक्षश्रेष्ठींकडून शिस्तभंगाची कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे जय पवार यांनी स्पष्ट केले. तसेच प्रचारात अजितदादांचे नाव किंवा फोटो वापरून पक्षाला आणि कुटुंबाला अडचणीत आणणे योग्य नसल्याचेही ते म्हणाले. आगामी निवडणुकीत कुणावरही वैयक्तिक चिखलफेक न करता दुष्काळी स्थितीत शेतकऱ्यांचे कल्याण करणे आणि कारखाना अधिक सक्षमपणे चालवणे या मुद्द्यांवरच आमचा भर असेल, असे त्यांनी नमूद केले.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number