Jishnu Dev Varma : महाराष्ट्राला नवे राज्यपाल मिळाले! देवव्रत आचार्य यांच्या जागी जिष्णू देव वर्मा राज्यपालपदी

दिल्लीमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालाची घोषणा केली आहे. तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Jishnu Dev Varma : महाराष्ट्राला नवे राज्यपाल मिळाले! देवव्रत आचार्य यांच्या जागी जिष्णू देव वर्मा राज्यपालपदी

Jishnu Dev Varma : दिल्लीमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालाची घोषणा केली आहे. तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापुर्वी ते तेलंगणाचे राज्यपाल होते, आता तेलंगणाच्या राज्यपालपदी शिव प्रताप शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे जिष्णू देव वर्मा यांच्या ठिकाणी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आहे. यावेळी देशातल्या एकूण 9 राज्यांचे राज्यपाल नियुक्तीचे आदेश राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी दिले आहेत. 

हेही वाचा- Sharad Pawar: ‘जनतेचा विश्वास हेच माझे बळ…’; राज्यसभा अर्ज भरल्यानंतर शरद पवारांची भावूक पोस्ट

जिष्णू देव वर्मा यांचा जन्म 15 ऑगस्ट 1957 रोजी झाला असून ते मूळचे त्रिपुरा येथील आहेत तसेच तेलंगाना राज्याचे राज्यपाल होते. त्यांनी 1990 साली भाजपात प्रवेश केला. 1996, 1998, 1999 सालच्या निवडणुकीत त्यांनी त्रिपुरा इस्ट या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकलेली होती. जिष्णू देव वर्मा यांनी त्रिपुरा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणूनही काम केलेले आहे. तसेच त्यांनी वित्त, उर्जा, ग्रामविकास यासारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळलेली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number