Jyoti Waghmare : खासदार होताच ज्योती वाघमारे पोहोचल्या आपल्या जुन्या घरी; स्वागत पाहून झाल्या भावूक, म्हणाल्या…

नवनियुक्त खासदार ज्योती वाघमारे यांनी खासदार झाल्यानंतर आपल्या जुन्या स्मृतींना उजाळा दिला. ज्या झोपडपट्टीतून त्यांचा संघर्षमय प्रवास सुरू झाला, त्याच जुन्या घरी त्यांनी पहिल्यांदाच भेट दिली.

Jyoti Waghmare : खासदार होताच ज्योती वाघमारे पोहोचल्या आपल्या जुन्या घरी; स्वागत पाहून झाल्या भावूक, म्हणाल्या…

Jyoti Waghmare Old House Visit: शिवसेनेच्या आक्रमक प्रवक्त्या आणि नवनियुक्त खासदार ज्योती वाघमारे यांनी खासदार झाल्यानंतर आपल्या जुन्या स्मृतींना उजाळा दिला. सोलापूरमधील ज्या झोपडपट्टीतून त्यांचा संघर्षमय प्रवास सुरू झाला, त्याच जुन्या घरी त्यांनी पहिल्यांदाच भेट दिली. यावेळी परिसरातील नागरिक आणि कुटुंबीयांनी त्यांचे औक्षण करून आणि फटाक्यांच्या अतिषबाजीत जंगी स्वागत केले. आपल्या माणसांच्या या अफाट प्रेमामुळे खासदार वाघमारे कमालीच्या भावूक झाल्या आणि त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले.

‘मोठ्या बापाची लेक नाही, संघर्षातून इथवर आले’
आपल्या भावना व्यक्त करताना ज्योती वाघमारे म्हणाल्या की, “आज झालेलं स्वागत हे माझ्या आयुष्यातील कष्टाचं चीज झाल्यासारखं आहे. मी कोणत्या मोठ्या बापाची लेक नाही, तर याच झोपडपट्टीतील घरातून मी शिकले आणि लहानाची मोठी झाले. ज्या पिंपळाच्या झाडाखाली आणि कट्ट्यावर बसून मी अभ्यास केला, आज तिथेच माझ्या गोरगरीब कष्टकरी भाऊ-बहिणींनी स्वतःच्या कष्टाच्या पैशातून माझा सत्कार केला, याचा मला सार्थ अभिमान आहे.” त्यांच्या या विधानाने उपस्थित सोलापूरकरांची मने जिंकली.

सोलापूरची ‘शोला’ आता दिल्लीच्या संसदेत धडकणार
सोलापूरच्या ऐतिहासिक वारशाचा उल्लेख करत त्यांनी दिल्लीत काम करण्याचा आपला निर्धार व्यक्त केला. “सोलापूरला स्वामी समर्थ, पंढरपूरचा विठुराया आणि तुळजाभवानी मातेचा आशीर्वाद आहे. 1930 मध्ये सोलापूरकरांनी ब्रिटिशांनाही लंडनला पळून जाण्यास भाग पाडले होते, हा आमचा इतिहास आहे. म्हणूनच ब्रिटिश सोलापूरला ‘शोला’ (अग्नी) म्हणायचे. आता हीच सोलापूरची ‘शोला’ दिल्लीच्या संसदेत सामान्य लोकांच्या कल्याणासाठी धडकेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – Farmer Loan Waiver Update : ‘या’ बँकेतील शेतकऱ्यांना होणार कर्जमाफीचा फायदा? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

गरिबांच्या घरात दिवा लावण्यासाठी करणार काम
संसदेत सोलापूरकरांची मान अभिमानाने उंच होईल असेच काम करण्याचे वचन त्यांनी दिले. “ज्या घरांमध्ये अजूनही अंधार आहे, तिथे विकासाचा दिवा लावण्यासाठी माझा प्रयत्न राहील,” असे सांगत त्यांनी आपल्या पुढील वाटचालीचे ध्येय स्पष्ट केले. सोलापूरच्या एका सामान्य कुटुंबातील मुलगी जेव्हा संसदेत जाते, तेव्हा तो विजय संपूर्ण सोलापूरचा असतो, अशी भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number