KDMC Election 2026 : सेनेनं खातं उघडलं!; कल्याण – डोंबिवलीत शिवसेनेचे 3 नगरसेवक उमेदवार बिनविरोध विजयी

कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 24 मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी हे शिवसेनेचे तीन नगरसेवक उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहे.

KDMC Election 2026 : सेनेनं खातं उघडलं!; कल्याण – डोंबिवलीत शिवसेनेचे 3 नगरसेवक उमेदवार बिनविरोध विजयी

कल्याण डोंबिवली : कल्याण – डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 24 मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी हे शिवसेनेचे तीन नगरसेवक उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. यामुळे यांच्यासमवेत प्रभागात उभे असलेल्या भाजपच्या ज्योती पाटीलदेखील विजयी झाल्या आहेत. यामुळे कल्याण – डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेनेने आपले खाते उघडले आहे. कल्याण डोंबिवलीत महायुतीचा शतःप्रतिशत महापौर बसणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.   

हेही वाचा : Pooja More Video : पहलगामसंबंधीत 'ते' वक्तव्य भोवलं; पूजा मोरेंच्या अश्रूंचा बांध फुटला, ओक्साबोक्सी रडतं सांगितला घडलेला प्रकार

कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 24 मधील निवडणूक निकालांनी स्थानिक राजकारणात शिवसेनेचे स्थान अधिक भक्कम केले आहे. या प्रभागात शिवसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले असून भारतीय जनता पक्षाचा एक उमेदवार विजयी झाला आहे. तिन्ही जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्याने शिवसेनेला मिळालेला हा तिहेरी बिनविरोध विजय पक्षाच्या संघटनात्मक ताकदीचा आणि शिवसेनेवर असलेल्या जनतेच्या विश्वासाचा विजय असल्याचे बोलले जात आहे. तर या तिन्ही नगरसेवकांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून व्हिडिओ कॉलद्वारे अभिनंदन केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number