मुंबई : कोकणचं अर्थकारण हे मासेमारी आणि पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. त्याचबरोबर येथील आंबा ,काजू, कोकम आदि उत्पादनांना देशात आणि जगभरात मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. अत्याधुनिक पद्धतीने मासेमारी केल्यास आणि येथील बंदरांचा विकास करून त्याला पर्यटन आणि उद्योग-व्यवसायाची जोड दिल्यास कोकणचा विकास अधिक प्रगतीनं होईल, असा विश्वास कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे. खातेवाटप झाल्यावर नितेश राणे यांचं जिल्ह्यात जंगी स्वागत करण्यात आलं, त्यावेळी त्यांनी आपल्यावर दिलेल्या जबाबदारीला न्याय देणार असं सांगितलं.
बंदर खात्यातून उद्योग व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करेन. कोकण आणि महाराष्ट्राचा विकास करणार आहे. एका बाजूने किनारपट्टीचा विकास आणि दुसऱ्या बाजूने किनारपट्टीचे संरक्षण करेन अशा विश्वास कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
नितेश राणे यांनी विधीमंडळाच्या सभागृहात सातत्याने राज्याला लाभलेल्या 720 सागरी किनारपट्टीचा पर्यटन विकास करण्याबरोबरच कोकणातील बंदरांचा विकास करून त्याला येथील उत्पादनांच्या व्यवसायवाढीची जोड देण्याचे विषय लावून धरले आहेत. आपल्याला मिळालेलं खातं आपल्याच आवडीचा विषय असल्याने त्यात मोठी कामगिरी करून दाखवण्याचा त्यांचा मानस आहे.
हेही वाचा : भुजबळांच्या वर्चस्वाला राष्ट्रवादीचेच आव्हान
राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. मात्र पालमंत्रीपद निश्चित झालेले नाही. आज कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला. या दरम्यान सिंधुदुर्गचा नवा पालकमंत्री कोण असेल असा प्रश्न निर्माण झाला. आधी डोबिंवलीचे रवींद्र चव्हाण यांना सिंधुदुर्गचे पालकमंत्री मिळाले होते. त्यांनी जिल्ह्याचा विकासही केला. त्यांनी जिल्ह्यात भाजपा वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र आता नितेश राणे मंत्री झाले आहेत आणि त्यांनाच पालकमंत्रीपज मिळावे असा सूर सर्वसामान्य नागरिकांमधून उमटताना दिसत आहे. यावर आता मुख्यमंत्री कोणाला पालकमंत्रीपद देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.