Bihar Assembely Elections 2025 : ‘आम्ही जिंकणार आहोत’; तेजस्वी यादव यांनी व्यक्त केला विश्वास

पटना : महाआघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आणि राजद नेते तेजस्वी यादव यांनी, “आम्ही जिंकणार आहोत. सर्वांचे आभार. एक बदल येणार आहे. आम्ही सरकार स्थापन करत आहोत”, अशी आशा व्यक्त केली आहे. महागठबंधनचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आणि राजदचे प्रमुख लालू यादव यांचे पूत्र तेजस्वी यादवांचा मतदारसंघ असल्यानं राघोपूर मतदारसंघ अतिशय महत्वाचा बनला आगे. 2015 पासून तेजस्वी यादव राघोपूरचे आमदार […]

Bihar Assembely Elections 2025 : ‘आम्ही जिंकणार आहोत’; तेजस्वी यादव यांनी व्यक्त केला विश्वास

पटना : महाआघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आणि राजद नेते तेजस्वी यादव यांनी, “आम्ही जिंकणार आहोत. सर्वांचे आभार. एक बदल येणार आहे. आम्ही सरकार स्थापन करत आहोत”, अशी आशा व्यक्त केली आहे. महागठबंधनचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आणि राजदचे प्रमुख लालू यादव यांचे पूत्र तेजस्वी यादवांचा मतदारसंघ असल्यानं राघोपूर मतदारसंघ अतिशय महत्वाचा बनला आगे. 2015 पासून तेजस्वी यादव राघोपूरचे आमदार आहेत. मतदारसंघ यादव बहुल असल्यानं कायम राजदचाच वरचष्मा राहिला आहे.

हेही वाचा : Bihar Assembely Elections 2025: मतमोजणी सुरू; बिहारमध्ये NDA आणि महागठबंधमध्ये तुफानी टक्कर

बिहारच्या हाजीपूर लोकसभा मतदारसंघात येणारी राघोपुरच्या जागेवर तेजस्वी यादव निवडणूक लढवत आहेत. याठिकाणी त्यांच्याविरोधात भाजपचे नेते सतीश कुमार आणि लोकजनशक्ती पार्टीचे नेते राकेश रोशन रिंगणात आहेत. राघोपुर मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून याठिकाणी आतापर्यंत 20 निवडणुका झाल्या आहेत. यापैकी प्रत्येकी पाच-पाच वेळा काँग्रेस आणि राजदने या मतदारसंघात विजय मिळवला आहे. तर जनता दल आणि संयुक्त सोशालिस्ट पार्टीने प्रत्येकी दोनवेळा येथील निवडणूक जिंकली आहे. तर संयुक्त जनता दलाला केवळ एकदाच राघोपूर विधानसभा मतदारसंघात विजय मिळाला आहे. नव्वदीच्या दशकापासून या मतदारसंघाची लालूप्रसाद यादव यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख निर्माण होण्यास सुरुवात झाली. या मतदारसंघात 30 टक्के यादव मतदार आहेत. तर भूमिहार आणि पासवान मतदारांचीही संख्याही लक्षणीय आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number