Wednesday, May 14, 2025 11:51:12 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक दिल्ली दौऱ्यावर

सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. दरम्यान, ते महत्त्वाच्या बैठका घेणार आहेत. महाराष्ट्रातील अनेक रखडलेल्या प्रकल्पांसंदर्भात झालेल्या बैठका महत्त्वाच्या मानल्या जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक दिल्ली दौऱ्यावर

दिल्ली: सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. यादरम्यान, ते महत्त्वाच्या बैठका घेणार आहेत. महाराष्ट्रातील अनेक रखडलेल्या प्रकल्पांसंदर्भात झालेल्या बैठका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. त्याचबरोबर, पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

सध्या महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प रखडले आहेत. या प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही प्रशासकीय बैठका घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासोबतच, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील नागरिकांचा देखील मृत्यू झाला आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था यासंदर्भात देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

हेही वाचा: गुलाबराव देवकरांचा राष्ट्रवादीत प्रवेश; चौकशीला सुरूवात

दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा वाद:

महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता स्थापन झाल्यापासून अजूनही रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा वाद काही संपलेला नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्यातील तीन प्रमुख नेत्यांनी आधीच या विषयावर चर्चा केली आहे. मात्र, यावर अजूनही तोडगा काही निघाला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यादरम्यान या विषयावर देखील चर्चा होण्याची अपेक्षा आहे.

महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता:

महाराष्ट्रातील मुंबई महानगर प्रदेश, तसेच पुणे, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये अनेक प्रकल्प अजूनही रखडलेले आहेत. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून या प्रकल्पांचे पूर्णत्व महत्त्वाचे ठरेल. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि नियामक अटींचे पालन करण्याबाबत काही महत्त्वाच्या बैठकांचा आयोजन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


सम्बन्धित सामग्री