बळीराजाची दिवाळी होणार गोड! दुष्काळाच्या संकटात सरकारकडून 5000 रुपयांची मदत जाहीर

Big Diwali Relief for Maharashtra Farmers : यंदाच्या दिवाळीपूर्वी प्रत्येक शेतकऱ्यांच्या 5 हजार रुपये जमा करण्याचा महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. दिवाळी सणाच्या तोंडावर असताना बळीराजाच्या हातात पैसे असावेत, कुटुंबाचा खर्च भागवता यावा या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

बळीराजाची दिवाळी होणार गोड! दुष्काळाच्या संकटात सरकारकडून 5000 रुपयांची मदत जाहीर
Big Diwali Relief for Maharashtra Farmers

यंदाच्या दुष्काळामुळे शेतकरी संकटात असताना राज्य सरकारने मोठा दिलासा दिलेला आहे. यंदाच्या दिवाळीपूर्वी प्रत्येक शेतकऱ्यांच्या 5 हजार रुपये जमा करण्याचा महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. दिवाळी सणाच्या तोंडावर असताना बळीराजाच्या हातात पैसे असावेत, कुटुंबाचा खर्च भागवता यावा या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

या मदतीची अंमलबजावणी तातडीने करण्याचे आदेश प्रशासनाला आता देण्यात आलेले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे. तर दुसरीकडे कर्जमाफी प्रक्रियेलाही वेग आलेला आहे. राज्य सरकारने नव्याने साडेतीन लाख शेतकऱ्यांच्या याद्यांची पडताळणी पूर्ण केली असून, या शेतकऱ्यांच्या खात्यात लवकर कर्जमाफीचे ही पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. सरकारच्या या दुहेरी निर्णयामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवळीपूर्वी मोठा आधार मिळणार असून, सण गोड होण्याची आशा निर्माण झाली आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number