दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकटक मदत करण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यातील तब्बल 265 तालुके हे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले असून, या तालुक्यांमध्ये मदत दिली जाणार आहे. संबंधित ठिकाणी जाऊन पंचनामे सुरु करण्यात आले असून, 12 तातडीच्या उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. तर उर्वरित तालुक्यांमध्येही नुकसानाची पाहणी करुन त्यानुसार पुढे निर्णय घेतला जाईल, असं देवेंद्र फडणवीसांना सांगितलं.
ज्या काही तालुक्यांमधून दुष्काळग्रस्त यादीमध्ये समावेश नसल्याच्या तक्रारी सध्या येत आहे. तिथंही शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली जाणार आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ट्रिगर 3 या अंतर्गत मदतीस समाविष्ट केले जाईल. राज्यातील कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी हे मदतीपासून वंचित राहणार नाही, असं आश्वासन मुख्यंमत्री फडणवीस यांनी दिलं आहे. ज्या काही तालुक्यांमध्ये अडचणी आहेत, त्या दूर करण्यासाठी सरकारकडून आवश्यक निर्णय घेतले जातील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.